एखादी हिंसक घटना घडत असताना तेथे रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकारावरच हिंसाचारात सहभागी असल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्याचे अत्यंत संतापजनक प्रकार यापुर्वी अनेकदा घडले आहेत.याच मालेतला प्रकार आज नागपूर जिल्हयाच्या नरखेडा तालुक्यातील सावरगाव येथे घडला.सावरगाव येथील पाणी टंचाईला वैतागलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर आज मोर्चा काढला होता.लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न आणि पाणी प्रश्‍नाचा पाठपुरावा केलेला असल्यानं सकाळचे बातमीदार योगेश गिरडकर तेथे रिपोर्टिगसाठी हजर होते.सरपंचांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही आणि स्वतः सरपंच देखील मोर्चेकर्‍यांना बर्‍याच उशिरा सामोरे गेले.त्यामुळं चिडलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपचंयात कार्यालयाची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली.त्याची तक्रार सरपंच आणि ग्रामसेवकाने नरखेड पोलिसांत दिली.या तक्रारीत मोडतोड करणारे जी दहा-पंधरा नावं दिलीत त्यात योगेश गिरडकर यांचेही नाव आहे.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या प्रकरणी नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस योगेश कोरडे जातीनं लक्ष देत असून त्यांनी पोलिस अधीक्षखांना बोलून पत्रकारावर गुन्हा दाखल करू नये अशी विनंती केली आहे.पत्रकारिता हा गुन्हा आहे काय नसेल तर रिपोर्टिगला घटनास्थळावर जायचे नाही काय असे प्रश्‍न पडतात.मात्र पत्रकारांवरची खुन्न्स अशा प्रसंगी काढून त्याला अडकविण्याचे प्रयत्न केले जातात या निषेधच झाला पाहिजे.योगेश गिरडकर यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही याची दक्षता नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ घेत असून मराठी पत्रकार परिषद योगेश बरोबर आहे..–

1 COMMENT

  1. पत्रकार संघाचे सहकार्याबद्दल आभार….
    योगेश गिरडकर,सावरगाव….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here