जॉर्जियाः रिपोर्टिंगसाठी गेला आणि लग्न जमवून आला..ही गोष्ट आहे एका की्रडा पत्रकाराची..नाव आहे निकलेश जैन.तो केवळ पत्रकारच आहे असं नाही तर बुध्दीबळपटू देखील आहे.जॉर्जियात सुरू असलेल्या बुध्दीबळ ऑल्मपियाड सामने कव्हर करण्यासाठी तो गेला.एका खेळाडू महिलेच्या प्रेमात पडला..अन चक्क लग्न जमवूनच्या पठ्ठया आला.फ्रेंको असं निकलेशच्या मैत्रीनीचं नाव.ते स्पेनिश आहे.ती ग्रँड मास्टर किताब विजेती आहे.निकेलशनं तिला स्पर्धे दरम्यानच लग्नाची मागणी घातली.तीनंही लगेच हो म्हटलं.हे दृश्य उपस्थित लाखो लोकांच्या मोबाईलमध्ये कैद झालं.निकलेशनं दीड वर्षांपूर्वी एका सामन्यात एका नामांकित बुध्दीबळपटूला हरवले होते.त्यामुळं फ्रेंक त्याच्यावर चांगलीच प्रभावित झाली होती.त्यामुळं दोघांत मैत्री झाली.दोघेही बुध्दीबळपटू असल्यानं त्यांची मैत्री घट्ट झाली.प्रश्‍न भाषेचा होता.फ्रेंको स्पेनिश तर निकलेश हिंदी भाषक.दोघांनीही तोडकीमोडकी इंग्रजी येते.त्यानंतर ट्रान्सलेशन अ‍ॅपच्या माध्यमातून दोघांनी संवाद साधला.

LEAVE A REPLY