रायगड वार्तापत्र

0
902

रायगडमधील अनेक धरणं कोरडी पडली

रायगड पाणीटंचाई मुक्त कऱण्याचा संकल्प 

हेटवणेचं पाणी शहापाडा धरणात सोडणार

मोरा बंदर ते भाऊचा धक्का मार्गावर स्पीड बोट सेवा सुरू
————————————————————–
कोकणातील भूमी आणि परिस्थिती मोठ्या धऱणास पोषक अथवा अनुकूल नाही असा अहवाल एका समितीनं दिल्यानंतर रायगडात मोठी धरणं बांधण्याचा प्रय़त्न झालाच नाही.त्यामुळं साडेतीन हजार मिली मिटर पाऊस पडूनही सारे पाणी समुद्राला जाऊन मिळते आणि उन्हाळ्यात पाणी टंचाई भेडसावते.लघुपाटबंधारे विभागाचे जे 28 लघु आणि मध्यम जलसिंचन प्रकल्प आहेत त्याची पाणी साठवण क्षमता गरजेच्या तुलनेत फारच कमी आहे.त्यातच जे 28 प्रकल्प आहेत तेही गाळानं भरलेली असल्यानं त्यातील पाणीसाठी जेमतेम मार्च एप्रिलपर्यतच तहान भागवू शकतो.भुगर्भातील पाण्याचा होणारा प्रचंड उपसा आणि बाष्पीभवनामुळेही एप्रिलमध्येच अनेक धरणं अथवा तलाव तळ गाठतात.आजची स्थिती अशी आहे की,रायगडमधील 28 प्रकल्पात केवळ 36 टक्केच पाणी साठा शिल्लक आहे.प्रादेशिक योजनेती तीनविरा आणि शहापाडा या धऱणांनी तळ गाठला आहे,तर फणसाड,कवेळे,रानिवली,आणि वरंध ही धरणे येत्या काही दिवसातच कोरडी पडणार आहेत.त्यामुळे अनेक गावांसमोर पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण होणार आहे.जिल्हा प्रशासनाने पाणी पुरवठ्यासाठी साडेसहा कोटीचा आराखडा तयार केला आहे.सुदैवानं पेणमधील आंबेघर,हेटवणे,रोहा तालुक्यातील सुतारवाडी,सुधागड तालुक्यातील उन्हेरे,आणि अलिबाग तालुक्यातील उमठे धरणात चांगला पाणी साठी असल्याने या धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना पाणी टंचाई जानवणार नाही.जिल्हयातील धरणात सरासरी 36 टक्केच पाणी साठा असला तरी तो जूनपर्यत पुरेसा आहे असा दावा कोलाडच्या लघु पाटबंधारे विभागानं केला आहे.

रायगड पाणीटंचाई मुक्त कऱण्याचा संकल्प

रायगडमध्ये 3500मिली मिटरपेक्षा जास्त पाऊस पडत असला तरी जिल्हयातील अनेक गावांना दरवर्षी पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं.पाणी पुरवठा कऱण्यासाठी आता पर्यथ सरकारनं कोट्यवधी रूपये खर्च केले असले तरी पाणी टंचाई दूर झाली नव्हती.आता जिल्हा प्रशासनानं 2019 पर्यत संपूर्ण रायगड जिल्हा पाणीटंचाई मुक्त कऱण्याचा निश्चय केला असल्याने जिल्हयातील जनतेला दिलासा मिळणार आहे.त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयानं सर्वासाठी पाणी आणि टंचाईमुक्त रायगड मोहिम आखली असून ही मोहिम यशस्वी कऱण्यासाठी विविध स्तरावर प्रय़त्न कऱण्यात येणार आहे.त्यासाठी जलयुक्त शिवार अभियान आखण्यात आले असून त्यासाठी 22 कोटी रूपायंचा निधी उपलब्ध झाला आहे.लोकवर्गणीतून आणखी 28 कोटी रूपये उभारण्याचा संकल्प जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सोडला आहे.
जनयुक्त शिवार अभियानांतर्गत पावसाचे जास्तीत जास्त पाणी अडवून त्याचा टंचाईच्या काळात वापर केला जाणार आहे.सिंचनक्षमता ,संरक्षित क्षेत्रात पाण्याचा वापर,पाणी पुरवठ्याचे पुनर्जिविकरण,पुनर्जिवित केंद्रीत पाणीसाठी,भुजलअधिनियम अंमलबजावणी आणि पाणी साठविण्यासाठी नव्या योजना कार्यान्वित कऱणे,भुजल पाण्याची पातळी वाढविणे,जलस्त्रोत बधारे बांधणे,तलाव पुनर्स्थापित कऱणे,जलस्त्रोतातील गाळ काढणे,वृक्षलागवडीला प्रोत्साहन,गावातील तळी,बंधाऱ्याबाबत जनजागृती करणे,शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षेम वापर कऱणे,पाणी अडवा पाणी जिरवा अशी उद्दिष्टे निश्चित कऱण्यात आल्याचे भांगे यांनी स्पष्ट केले.या योजनेचे काम 1 जूनपर्यत पुर्ण करण्यात येणार आहे.या कामात हयगय करणे,किंवा दर्जेदार कामं झाली नाहीत तर संबंधित कार्यालयावर कारवाई कऱण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.निकृष्ट काम झाल्यास त्याचा खर्च अधिकाऱ्याच्या पगारातून वसूल करण्यात येणार असल्याची तंबी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.हे अभियान यशस्वी कऱण्यासाठी जनतेनंही सहकार्य कऱण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी केलं आहे.

हेटवणेचं पाणी शहापाडा धरणात सोडणार

खारेपाटातील पाणी टंचाई ही गेल्या अनेक वर्षांची डोकेदुखी आहे.या भागातील 15 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात येणारी 27 गावं आणि 43 वाड्या डिसेंबरपासूनच पाणी टंचाईचा मुकाबला करीत असतात.खारेपाटातील ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी दरवर्षी लाखो रूपये खर्च होत असले तरी त्यावर परिणामकारक तोडगा मात्र मिळू शकलेला नव्हता.खारेपाटातील पाणी टंचाईवरून अनेकदा राजकारणही झालेलं आहे.मात्र आता हेटवणे धरणातले पाणी शहापाडा धऱणात सोडून नवी नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित कऱण्यात येणार असल्याने या भागातील पाणी टंचाई दूर व्हायला मदत होणार आहे.या योजनेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून 30 कोटी रूपये निधी मिळणार आहे.हा प्रश्न स्थानिक आमदार धैर्यशील पाटील यांनी सातत्यानं विधानसभेत उपस्थित करून सरकारचे गंभीर पाणी टंचाईकडं लक्ष वेधले होते,त्यानंतर आता हेटवणे ते शहापाडा ही थेट पाणी पुरवठा योजना मूर्त रूप घेत आहे.20 किलो मिटर अंतराची ही पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर खारेपाटातील पाणी प्रश्न कायमचा सुटेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.हेटवणे धरणात 80 दशलक्ष घनमिटर पाणी साठा उपलब्ध असल्याने पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

– मोरा बंदर ते भाऊचा धक्का मार्गावर स्पीड बोट सेवा सुरू

लोकलमध्ये बसून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाण्याचे उरणकरांचे स्वप्न प्रत्यक्षात यायला आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार असली तरी उरणनजिकच्या मोरा बंदरातून थेट भाऊच्या धक्क्यापर्यत केवळ अर्ध्या तासात पोहचण्याचे उरणकरांचे स्वप्न मात्र आता प्रत्यक्षात आले आहे.भाऊचा धक्का ते मोरा बंदर या मार्गावर आता स्पीड बोट सेवा सुरू झाली आहे.त्यामुळे उरणकर आनंदात आहेत.
मोरा बंदर ते भाऊचा धक्का मार्गावर गेली अनेक वर्षेजुनाट आणि वेळ खाऊ बोट सेवा सुरू होती.मात्र उरणकरांची आता या त्रासातून सुटका होणार आहे.या जलमार्गावर स्पीड बोट सेवा सुरू कऱण्यासाठी आर.एम.शिपिगने ऑक्टोबरमध्ये सरकारकडं परवानगी मागितली होती.ती सरकारने तात्काळ दिल्यानंतर 17 एप्रिलपासून या मार्गावर स्पीड बोट सेवा सुरू झाली आहे.दर तासाला ही सेवा असेल.अवघ्य़ा तीस मिनिटात मोरा ते भाऊचा धक्का हे सागरी अंतर ही स्पीडबोट पार करणार आहे.त्यामुळे उरण आता मुंबईचं उपनगरच झाल्यासारखे होणार आहे.एकेरी प्रवासासाठी 52 रूपये तिकिट आकारले जात आहे.केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते या जलसेवेचे उद्घघाटन कऱण्यात आलं.गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा या जलमार्गावर यापुर्वीच स्पीड बोट सेवा सुरू झालेली असल्याने अलिबागच्या विकासाला नवे परिमाण लाभले आहे.जलवाहतुकीला अग्रक्रम देण्याच्या नितीन गडकरी यांच्या संकल्पनेमुळे कोकणातील विविध बंदरं आता जलमार्गेमुंबईशी जोडली जात आहेत.आता एलिफन्ट ालण्याला भेट देणाऱ्या देशी -विदेशी पर्यटकांची संख्या लक्षात घेता गेटवे ते घारापुरी या मार्गावर स्पीडबोट सेवा सुरू करावी अशी मागणी होत आहे.गेटवे ते घारापुरी हे अंतर आठ नॉटीकल मैल एवढे आहे.

– शोभना देशमुख अलिबाग-रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here