रायगड जिल्हा वार्तापत्र –

0
1043

– मत दार जनजागृती मोहिमेला चांगला प्रतिसाद

– रायगड जिल्हयातील सात विधानसभा मत दार संघात 15 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या निवडणुकांच्यादृष्टीनं जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा पूर्ण ताकतीनिशी कामाला लागली आहे.मतदार नोंदणीसाठी जोरदार मोहिम उघडल्याचे परिणाम दिसून आले असून लोकसभेच्या तुलनेत जवळपास मत दारांच्या संख्येत जवळपास पाच लाखांनी वाढ झाली आहे.आता आव्हान आहे ते नोंदविलं गेलेलं मतदान जास्तीत जास्त होईल यासाठी प्रय़त्न करण्याचे.त्यासाठी देखील प्रशासनानं कंबर कसली असून किमान 75 टक्के मतदान होईल यादृष्टीनं प्रय़त्न सुरू आहेत. – लोेकसभा निवडणुकीत 64.57 टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवाढी वाढावी यासाठी स्वीप-2 कार्यक्रमांतर्गत मत दार जागृती मोहिम जिल्हाभार राबविण्यात येत आहे.त्यासाठी पथनाट्यं,लोककलावंत,पोस्टर्स,होर्डिग्ज,दृकश्राव्य माध्यम,तसेच रिक्षात ध्वनीक्षेपन लावूून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन कऱण्यात येत आहे.या कार्यात बॅका,स्वयंसेवी संस्था तसेच शालेय विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जात असल्यानं राजकीय पक्षांच्या प्रचाराची नसली तरी निवडणूक यंत्रणेच्या प्रचाराची धामधूम जिल्हाभर दिसून येत आहे.जिल्हाधिकारी सुमंत भागे यांनी जास्तीत जास्त मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचा पवित्र हक्क बजवावा असं आवाहन केलं आहे.जिल्हयातील जनजागृती मोहिमेबाबत आपण समाधानी असल्याचं मत केंर्दीय जनजागृती निरिक्षक आर.एन.मिश्रा यांनी व्यक्त केलं आहे.

जिल्हयात मत दार संख्येत लक्षणीय वाढ

– रायगड जिल्हयात अलिबाग,पनवेल,कर्जत,उरण,पेण,श्रीवर्धन,महाड असे सात विधानसभा मत दार संघ असून या सातही मत दार संघात एकूण 19 लाख 76 हजार 272 मत दार आहेत.त्यात 10 लाख 11 हजार 621 पुरूष तर 9 लाख 64 हजार 651 महिला मत दार आहेत.श्रीवर्धन मत दार संघात पुरूषांच्या तुलनेत महिला मत दारांची संख्या अधिक आहे.तेथे 1 लाख 17 हजार 746 पुरूष मत दार असून 1 लाख 22 हजार 639 महिला मत दार आहेत.जिल्हयात सर्वाधिक 4 लाख 16 हजार 928 मत दार पनवेल विधानसभा मत दार संघात आहेत.सातही विधानसभा मतद ार संघात मिळून 2,448 मतदान केंद्रं असून यातील काही संवेदशील मत दान केंद्रावर विशेष देखऱेख ठेवली जाणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदी सुरेश टोकरे

– रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनी रायगडमधील राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत.रायगड जिल्हा परिषदेत पूर्वी शेकाप आणि शिवसेना युती होती. यचवेळी शेकाप-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाली आहे.रायगड जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल लक्षात घेता कोणत्याही दोन पक्षांना एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणं शक्य नव्हतं.त्यामुळं कोणते दोन पक्ष एकत्र येणार याबद्दल जिल्हयातील जनतेची उत्सुकता ताणली गेली होती.अखेर राष्ट्रवादी आणि शेकाप एकत्र येत रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली.त्यानुसार रविवारी झालेल्या अध्यक्ष,उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे..या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे सुरेश टोकरे यांची अध्यक्षपदी निवड झाली तर उपाध्यक्षपदी शेकापचे अरविंद म्हात्रे यांची निवड झाली.टोकर ेयांना 38 मतं मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतीस्पर्धी राष्ट्रवादीचे बंडखोर महेंद्र दळवी यांना 24 मत मिळाली.उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अरविंद म्हात्रे यांना 37 तर त्यांच्या निकटच्या प्रतीस्पर्धी शिवसेनेच्या विजया भुर्के यांना 24 मतं मिळाली.पक्षांनी व्हीप बजावल्यानंतरही राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी आणि कॉग्रेसच्या तीन सदस्यांनी महेंद्र दळवी यांना मतदान केल्यानं पाच मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे.अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून महेंद्र दळवी इच्छूक होते.मात्र पक्षानं त्यांना उमेदवारी न दिल्याने नाराज दळवी यांनी बंडखोरी करीत अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अज र् दाखल केला.त्यांना शिवसेनेने तसेच कॉग्रेस,राष्ट्रवादीच्या काही बंडखोरानी मदत केली.पक्षाचा व्हीप तोडणाऱ्या सदस्यांवर राष्ट्रवादी आता कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.दुसरीकडे महेंद्र दळवी देखील आता जिल्हयात राजकीय भूकंप घडविण्याच्या तयारीत असल्याची च र्चा आहे.त्यामुळं जिल्हा परिषदेच्या निमित्तानं खेळलं गेलेलं हे राजकारण विधानसभा निवडणुकांवर परिणाम करेल अशीच चिन्हं आहेत.

–  राजकीय पक्षांत अजून शांतताच

– पितृपंधरवाडा आणि अजून बहुतेक राजकीय पक्षांचे उमेदवार नक्की झालेले नसल्यानं विधानसभा निवडणुकांची धामधुम अजून सुरू झालेली नाही.उद्या घटस्थापनेपासून उमेदवार आपले उमेदवारी अ र्ज दाखल करायला लागतील अशी शक्यता आहे.रायगड जिल्हयात सात विधानसभा मत दार संघ असून सध्या तीन शेकापकडं,दोन राष्ट्रवादीकडं तर प्रत्येकी एक शिवसेना आणि कॉग्रेसकडं आहे.मात्र कॉग्रेसचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकताच आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.भाजप प्रशांत ठाकूर यांनाच पनवेलची उमेदवारी देईल अशी शक्यता आहे.युती आणि आघाडीबाबतचा नि र्णय़ अध्याप होत नसल्यानं जिल्हयातही अनिश्चितता असली तरी रायगडमध्ये आता शेकाप आणि राष्ट्रवादीची आघाडी विधानसभेतही दिसेल हे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर स्पष्ट झालं आहे.मागच्या वेळेस जिल्हयात शेकाप-शिवसेना अशी युतीी होती.मात्र लोकसभा निवडणुकात शेकापनं आपले स्वतंत्र उमेदवार उभे केल्यान ंही युती संपुष्टात आली आहे.अलिबाग,पेण,पनवेल आणि उरणमध्ये शेकापला राष्ट्रवादी मदत करेल तर श्रीवर्धन,कर्जत आणि महाडमध्ये शेकाप राष्ट्रवादीला मदत करेल असे संकेत मिळत आहेत.शेकापनं आपले चार मत दार संघातील उमेदवार नक्की केले असले तरी अन्य पक्षांनी अजून आपले उमेदवार अधिकृतपणे जाहीर केलेले नाहीत.सुनील तटकरे यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानं श्रीवर्धमध्ये त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल याबद्दल जिल्हयात उत्सुकता लागलेली आहे.

शोभना देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here