रायगड जिल्हयातील 187 ग्रामपंचायतींचा कालावधी संपत असल्याने जून ते सप्टेंबर या कालावधीत या निवडणुका होत असून निवडणूक यंत्रणेनं त्यादृष्टीने कामाला सुरूवात केली आहे.7 मार्च ते 20 मार्च या कालावधीत प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे तर 21 मार्च ते 15 एप्रिल या कालवधीत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत.11 ते 13 एप्रिल या कालावधीत प्रभाग रचनांना अंतिम स्वरूप देण्यात येईल.त्यानंतर मतदानाच्या तारखा जाहीर होतील असं निवडणूक शाखेच्यावतीनं सांगण्यात आलं.लोकसभा निवडणुकींपुर्वी या निवडणुका होत असल्याने या निवडणुकांकडं जनमताची चाचणी हा दृष्टीनेच रायगडमधील राजकीय पक्ष पहात आहेत.जिल्हयात 806 ग्रामपंचायती आहेत..राजकीय पक्षांनी देखील निवडणुकांच्यादृष्टीनं जमवाजमव सुरू केली आहे..-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here