रायगडात पोलीस यंत्रणा सज्ज

0
641

रायगडात पोलीस यंत्रणा सज्ज

रायगड जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 118 मतदार संघात उद्या होत असलेले मतदान शांततेत पार पडावे यासाठी रायगड पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.पोलिसांनी विविध कलमांखाली 1,690 जणांवर कारवाई केली असून 70 जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे तर 401 जणांना शांतता भंग न कऱण्याबाबत नोटिसा बजावल्या गेल्या आहेत.मतदानासाठी जिल्हाय 173 पोलिस अधिकारी तैनात कऱण्यात येणार आहेत.त्यांच्या मदतीला 1893 पोलीस कर्मचारी,550 होमगार्डस,राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी,तसेच दंगल नियंत्रण पथक आणि जलद प्रतिसाद पथक तैनात कऱण्यात आले असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिलाी.
जिल्हयात जिल्हा परिषदेसाठी 114 आणि पंचायत समितीसाठी 232 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.जिल्हा परिषदेसाठी शिवसेना सर्वाधिक 46 भाजप 40 शेकाप 30 राष्ट्रवादी 26 कॉग्रेस 21 अपक्ष 16 आणि अन्य 2 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.उद्या मतदान झाल्यानंतर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here