रायगड जिल्हयातील पाच नगरपंचायतीच्या निवडणुका 10 जानेवारीला होत असून सर्वच ठिकाणी शिवसेना,भाजप,कॉग्रेस,राष्ट्रवा दी,शेकाप असे पंचरंगी सामने होणार असे चित्र आहे.काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हसळ्यात 17 जागासाठी 73 उमेदवार,माणगावमध्ये 116,पोलादपूरमध्ये 64,तळ येथे 79 आणि खालापूरमध्ये 86 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.या पाचही शहरात नगरपंचायतीच्या निवडणुका प्रथमच होत असल्याने सर्वच पक्षांना बंडखोरीचा मोठा फटका बसला असल्याने राजकीय पक्षांची चिता वाढली आहे.या निवडणुकांमुळे जिल्हयातील राजकीय वातावरण तापले आहे.–