रायगड जिल्हयात जुन महिन्यात झालेला समाधानकारक पावसामुळे पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असलेल्या 28 लघु आणि मध्यम प्रकल्पातील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.जिल्हयातील या 28 प्रकल्पात सरासरी 71.11 टक्के पाणी साठा झाला आहे.यातील 12 धरणं तर पाण्यानं तुडुब भरली आहेत.जी धऱणं भरली आहेत त्यामध्ये फणसाड,सुतारवाडी,उन्हेरे,पाभरे,वरंध,भिलवले,संदेरी आदि धऱणांचा समावेश होतो.गेल्या चार दिवसात पावसाने उघडीप दिली असली तरी आज काही ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे.जिल्हयात जून मध्येच सरासरीच्या 28 टक्के म्हणजे 855.66 मिली मिटर पाऊस झाला आहे.