रायगडवरील दुबार पेरणीचे संकट टळले

0
891

रायगड जिल्हयात जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने काही भाग वगळता दुबार पेरणीचे संकट टळले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुमंत भागे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
रायगड जिल्हयात 1 लाख 41 हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून त्यातील 10 हजार 500 हेक्टर भात रोपांची लागवड झाली आहे.या रोपांमधून 1 लाख 5 हजार हेक्टरच्या जवळपास भाताची लागवड होऊ शकते असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.अलिबाग तालुक्यातील 1000 ते 1200 हेक्टरवरील भात रोपाचे 50 टक्क्ेच्या जवळपास नुकसान झाले आङे.तेथे दुबार पेरणी करावी लागणार आहे.जिल्हयात बियाणे तसेच खतांची अथवा चाऱ्याची कसलीही टंचाई नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
रायगडमध्ये पाऊस झाला असला तरी धरणे अजून भरली नसल्याने जिल्हयात 55 वाड्या आणि 36 गावांना 14 टॅन्करव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
रायगडमध्ये 7 जुलैपर्यत 243.70 मिली मिटर पाऊस झाला आहे.आज सकाळी संपलेल्या 24 तासात जिल्हयात सरासरी 42 मिली मिटर पाऊस झालाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here