रायगडमध्ये   पाऊस 

    0
    745
    रायगड जिल्हयात सवर्त्र जोरदार पाऊस कोसळत असून जिल्हयातील बहुतेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत.गेल्या २४ तासात जिल्हयात एकूण पाऊस १६७८.६० एवढा पाऊस झाला असून काल सरासरी पाऊस १०४.९१ मिली मिटर झाला आहे.जिल्हयात सवार्धिक १९९ मिलीमिटर पाऊस तळ्यात नोंदविला गेला आहे.गेल्या १९ जून रोजी पडलेल्या पावसापेक्षा यंदा तब्बल नऊपट अधिक पाऊस झाला आहे.सतत दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे अंबा,कुुडंलिका,गांधारी,सावित्री,गाढी,पाताळगंगा या नद्यांना पूर आले असून या नद्या दुथडी भरून वाहात आहेत.सवर् नद्या धोक्याच्या खुणेखालून वाहत असल्याचे आपत्ती निवारण केंद्राकडून सांगण्यात आलं.आजही समुद्र खवळलेला असणार असून धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा लालबावटा बंदरावर लावण्यात आला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here