रायगडमधील शेतकरी दुहेरी संकटात    

0
809
  रायगड जिल्हयातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.गेली चार दिवस कोसळत असलेल्या वादळी पावसाने रायगडच्या अनेक भागातील भात पिकं आडवी झालेली आहेत.भाताला आता लोंब्या आलेल्या आहेत,त्यामुळं भाताची रोपं वजनदार झाली आहेत,थोड्या वार्‍यातही ती आडवी होतात अशा स्थितीत चार दिवस सोसाटयाच्या वार्‍यासह हस्ताचा पाऊस कोसळत असल्याने  अनेक ठिकाणी भाताचे पीक आडवे झाले आहे.त्यामुळे  शेतकरी चिंताक्रांत बनला आहे. वादळी वार्‍यासह कोसळणार्‍या पावसाने शेतकरी चिंतेत असतानाच आता दुसर्‍या बाजुला पिकांना वन्य प्राण्यांचा उपद्रव सुरू झाला आहे.फणसाड आणि कर्नाळा अभयारण्य परिसरात सर्वत्र भाताच्या लोंबीचा सुगंध दरवळत असल्याने रानडुकरं,भेकरासारखी श्‍वापतं त्याकडं आकृष्ट होत असून त्यांनी शेतीची धुळधाण सुरू केली आहे.वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि त्यांच्यामुळं ज्या शेताचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here