रायगडः शिवसेनेची पाच पंचायत समित्यांवर सत्ता

0
819
रायगड जिल्हयातील पंधरा पंचायत समितींच्या सभापती -उपसभापतीच्या निवडीत शिवसेनेने कर्जत,माणगाव,महाड,श्रीवर्धन,आणि मुरूड अशा पाच ठिकाणी आपले सभापती निवडून आणले आहेत.राष्ट्रवादी- आघाडीनेही खालापूर,पाली,रोहा,तळा,आणि म्हसळा अशा पाच ठिकाणी विजय संपादन केला आहे.शेकापनं अलिबाग,पेण,पनवेल,आणि उरण अशा चार पंचायत समित्या ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.पोलादपूरमध्ये आरक्षित जागेसाठी सभापतीपदासाठी उमेदवार न मिळाल्याने तेथीलसभापतीपद रिक्त राहिले आहे.मात्र तेथील उपसभापतीपद कॉग्रेसने जिंकले आहे.आज या निवडणुका शांततेत पार पडल्या.प्रत्येक पक्षानं आपले गड राखण्यात येश मिळविले असले तरी भाजपला जिल्हयात एकही पंचायत समिती जिंकता आलेली नाही.
रायगड मधील पंचायत समिती*
●अलिबाग
सभापती –  प्रिया पेढवी (शेकाप)
उपसभापती –  प्रकाश पाटील (शेकाप)
●उरण
सभापती – नरेश घरत (शेकाप)
उपसभापती – वैशाली पाटील (शेकाप)
●पनवेल
सभापती –  कविता पाटील (शेकाप)
उपसभापती –  वसंत काढावळे (काँ)
●पेण
सभापती –  स्मिता पेणकर (शेकाप)
उपसभापती –  तैलेश पाटील (शेकाप)
●मुरूड
सभापती –  निता घाटवळ (सेना)
उपसभापती –  प्रणिता पाटील (काँ)व
●कर्जत
सभापती –  अमर मिसाळ (सेना)
उपसभापती –  सुषमा ठाकरे (सेना)
●माणगाव
सभापती –  महेंद्र तेटगुरे (सेना)
उपसभापती –  माधवी समेळ (सेना)
●श्रीवर्धन
सभापती –  सुप्रिया गोवारी (सेना)
उपसभापती –  बाबूराव चोरगे (सेना)
●महाड
सभापती –  सिताराम कदम (सेना)
उपसभापती –  शुएब पाचकर (सेना)
●खालापूर
सभापती –  श्रद्धा साखरे (राष्ट्र आघाडी)
उपसभापती –  विश्वनाथ पाटील
●पाली
सभापती –  साक्षी दिघे (राष्ट्रवादी)
उपसभापती –  उज्वला देसाई (सेना)
●रोहा
सभापती – मिना चितळकर (राष्ट्रवादी)
उपसभापती –  विजया पाशीलकर (राष्ट्रवादी)
●तळा
सभापती –  रविंद्र नटे (राष्ट्रवादी)
उपसभापती –  गणेश वाघमारे (राष्ट्रवादी)
●म्हसळा
सभापती –   उज्वला सावंत (राष्ट्रवादी)
उपसभापती –  माधवी गायकर (राष्ट्रवादी)
●पोलादपूर
सभापती –  आरक्षित उमेदवार नाही
उपसभापती –  शैलेश सलागरे (काँ)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here