‘राम’ला हवाय मदतीचा हात….

0
839

…………………………………..
राम खटके…दिव्य मराठीचा सिटी रिपोर्टर…आता कुठे उत्तुंग झेप घेत असताना,काळाने त्याच्यावर मोठा आघात केला आहे.गोकुळअष्टमी दिवशी म्हणजे ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे मोटारसायकलवरून समतानगरमधील दिव्य मराठीच्या ऑफीसला येत असताना,वाटेत एका मोटारसायकलस्वाराशी त्याची जोरदार टक्कर बसली.त्यात तो मोटारसायकलवरून पाच फुट वर उडून खाली पडला.त्यात त्याच्या डोक्याला मार लागला.डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला.त्याला सोलापूरच्या डॉ.काटीवर हॉस्पीटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले.पण त्याच्या मेंदूला गंभीर दु:खापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती.त्याच्या मेंदूवर ऑपरेशन करण्यात आले.त्यातून तो थोडा बरा झाला.तो शुध्दीवर आला पण भान हरपून बसला.त्याला माणसे ओळखता येत नव्हती किंवा त्याला कोणाशी नीट बोलताही येत नव्हते.एका बालकाप्रमाणे त्याची अवस्था झाली.त्याची ही अवस्था मनाला अस्वस्थ करणारी होती.पंधरा दिवसांनंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आणि गावी भंडारवाडीला नेण्यात आले.
गावी आल्यानंतर त्याच्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी माणसाची मदत लागत होती.त्याच्या घरच्यांनी त्याला सांभाळले.पण आठ दिवसांपुर्वी त्यांला पुन्हा काटीकर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.दुर्देव असे की,त्याला आता अर्धांगवायुचा झटका आला असून,शरीराच्या हालचाली मंदावल्या आहेत.त्याची प्रकृती चिंताजनक आहे.आपण सर्वांनी त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करू या,हे राम आमच्या रामला बरे कर…
मित्रानो,रामचे वय आता कुठे ३० आहे.भंडारवाडीच्या गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला राम वयाच्या २० व्या वर्षी पत्रकारितेत आला.पत्रकारितेची डिग्री घेवून तो स्थानिक वृत्तपत्रात एक हजार रूपयापासून नोकरी करू लागला.लातूरहून प्रकाशित होणा-या यशवंत वृत्तपत्राने त्यांला ३ हजार रूपये मानधन आणि जाहिरात कमिशन दिले.तीन वर्षापुर्वी १२ हजाराची नोकरी त्यांला दिव्य मराठीत लागली.त्याचा पगार आता १६ हजारावर गेला होता.आता कुठे त्याला सुखाचे दोन घास मिळत असताना,काळाने त्याच्यावर मोठा आघात केलेला आहे.पहिल्या १५ दिवसांत त्याच्यावर साडेतीन लाखाचा हॉस्पीटल खर्च झालेला आहे.त्यातील ९४ हजार रूपये दिव्य मराठी प्रशासनाने दिले आहेत.बाकीचे काही मित्रानी आणि कुटुंबाने दिले आहेत.आता पुन्हा खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्याला उपचारासाठी मदत हवी आहे.आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून शक्य तितकी मदत रामला करावी.दुर्देवाने रामच्या पत्नीच्या नावावर बँक अकाऊंट नाही.काय मार्ग काढता येईल,याबाबत विचार सुरू आहेत.
संपर्क : रामच्या पत्नीच्या भाऊ अनिकेत माने या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here