इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी बिनविरोध जाहीर!!*
पुणे जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक (सन 2019-21)साठीची कार्यकारिणी आज बिनविरोध निवडण्यात आली.इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथील भरणेवाडी सोसायटी सभागृहात आज सकाळी तालुका संघाच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सर्व पत्रकार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पुणे जिल्हा संघाचे परिषद प्रतिनिधी एम जी शेलार व जिल्हा समन्वयक व हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील उर्फ नाना जगताप निवडणूक निर्णय अधिकारी यांनी काम पाहिले. तसेच यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस सतीश सांगळे ही उपस्थित होते.
बैठकीत सर्वानुमते पुढील कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.
*नूतन कार्यकारिणी**1)अध्यक्ष-*राजकुमार थोरात *2)तालुका समन्वयक-*धनंजय थोरात *3)उपाध्यक्ष-*रियाज सय्यद बाळासाहेब तांबे*4)कोषाध्यक्ष-*नितीन चितळकर *5)सहकोषाध्यक्ष-*प्रेमकुमार धर्माधिकारी *6)सरचिटणीस-*प्रदिप तरंगे*7)चिटणीस-*बाळासाहेब धवडे *कार्यकारिणी सदस्य-*सचिन लोंढे विनायक चांदगुडेशत्रुघ्न ओमासेपोपटराव मुळीकनारायण मोरेदिपक शिंदे सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*एम जी शेलार*निवडणूक निर्णय अधिकारी.*सुनील(नाना)जगताप*सहायक निवडणूक निर्णय अधिकारी.

सर्व नविन कार्यकारिणीचे परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here