– एस.एम.देशमुख यांना
विधान परिषदेवर पाठवा
कॉग्रेस नेते राजीव सातव यांची शिष्टमंडळाने घेतली भेट   

हिंगोली ( प्रतिनिधी ) राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून एस.एम.देशमुख यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या एका शिष्टमंडळानं आज कॉग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राजीव सातव यांच्याकडे केली आहे.नंदकुमार तोष्णीवाल यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्हा संघाच्या शिष्टमंडळाने आज राजीव सातव यांची कळमनुरी येथे भेट घेऊन काँग्रेसने एस.एम.देशमुख यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे करावी अशी विनंती केली.राजीव सातव यांनी देशमुख यांनी पत्रकार आणि समाजासाठी केलेल्या कार्याची आपणास माहिती असल्याचे स्पष्ट करीत सकारात्मक प्रतिसाद दिला. एस.एम.देशमुख यांच्याशी आपले घनिष्ट संबंध असून त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे राजीव सातव यांनी शिष्टमंडळाकडे स्पष्ट केले.
एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर पत्रकारांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.कॉग्रेसने एस.एम.देशमुख यांच्या नावाची शिफारस केली तर कॉग्रेसला पत्रकार संघटनेचा भविष्यात फायदा होईल हे वास्तवही शिष्टमंडळाने राजीव सातव यांच्या निदर्शनास आणून दिले.
नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यासमवेत उपाध्यक्ष दिलीप खोडके,कळमनुरी तालुका अध्यक्ष अलिमोद्दीन कादरी,संजय शितोळे आदि उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here