एबीपी माझा या वाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर हे एक प्रज्ञावंत पत्रकार आहेत.आटपाडी सारख्या एका सदा दुष्काळी भागातून येऊन महाराष्ट्राच्या पत्रकारितेत आपला वेगळा ठसा आणि स्थान निर्माण करणारे राजीव खांडेकर एक जागरूक आणि सामाजिक बांधिलकी जपणारे पत्रकार म्हणूनही ओळखले जातात.टीआरपीच्या मागं न धावता लोकांच्या प्रश्नांना आपल्या वाहिनीवर स्थान देऊन सामांन्यांचा आवाज व्यक्त कऱण्याचं काम ते सातत्यानं करीत आहेत.प्रिन्ट पासून सुरू झालेल्या त्यांच्या पत्रकारितेतला प्रवास जेवढा रोमहर्षक तेवढाच खडतड होता.एका प्रमुख मराठी चॅनलचे संपादक असलेल्या राजीव खांडेकर यांच्या या प्रवासातील अनेक किस्से तसेच प्रचलित विविध प्रश्नांवरील त्यांची रोखठोख मतं ऐकनं हा एक आनंदाचा क्षण असतो.ही संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत.
राजीव खांडेकर यांची विशेष मुलाखत आपण एकणार आहात मराठी पत्रकार
परिषदेच्या अधिवेशनात.7 जून 2015 रोजी दुपारी 4 वाजता
अधिवेशन 6 आणि 7 जून 2015
स्थळ -भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृह
आपण यावं ही आग्रहाची विनंती आहे.