या ‘चिमण्यांनो,परत फिरा रे’  सुनील तटकरेंची बंडखोरांना साद 

0
659

सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे आज अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करीत असतानाच काल रोहयात सुनील तटकरे यांनी नगरपालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला.रोहयात सी.डी.देशमुख सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात तटकरे यांनी जे पक्ष सोडून गेले आहेत त्याना या चिमण्यांनो,परत फिरा रे अशी साद घातली.रोहा शहराच्या विकासासाठी त्यानी परत यावे असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले.रोहा आणि एकूणच रायगडमध्ये राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे.सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे आज  मुंबईतील शिवसेना भवन येथे अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करीत आहेत.त्यांनी रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला असला तरी आता ते सेनेचे उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवत आहेत.दरम्याना शिवसेनेला नगराध्यक्षपदासाठी उमेदवार ठरविता आलेला नसल्याने त्यांची अवस्था सध्या कोणी उमेदवार देता का उमेदवार अशी झाली असल्याची टीका सुनील तटकरे यांनी केली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here