पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून माध्यमांशी दुरावा ठेवणारे,परदेशात जातानाही माध्म्रधानांना दूर ठेवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज अचानक माध्यमांचा पुळका आला.दिल्लीतील पत्रकारांसमोर बोलताना त्यांनी माध्यमांच्या भूमिकेचे तोंडभरून कौतुक केले आणि माध्यमांनी लेखणीचे झाडू करून स्वच्छतेबद्दल लेखण करावे असे आवाहन त्यांनी केले.

25 ऑक्टोबर :  ‘स्वच्छ भारत’ अभियानाबाबत जागृती निर्माण करण्यात प्रसारमाध्यामांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगत, प्रसारमाध्यमांमुळेच ‘स्वच्छता अभियान’ ही सरकार आणि नागरिकांची एकत्रित जबाबदारी असल्याच्या संकल्पनेला बळ मिळाल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. दिल्लीत भाजप मुख्यालयात दिवाळीनिमित्त आयोजित ‘दिवाळी मिलन’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिकरित्या संवाद साधला. या कार्यक्रमाला भाजपाध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह भाजपाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

गेल्या महिन्याभरापासून आपण ‘स्वच्छ भारत अभियाना’बाबतचे लिखाण वाचत असून पत्रकारांनी स्वच्छता, आरोग्यावर सातत्याने लेख लिहिले. यामुळेच स्वच्छतेचा विषय चर्चेत राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सरकार, जनताही जागृत झाली असून ही एकप्रकारे देशसेवाच आहे असे सांगत मीडियामध्ये देश घडवण्याची मोठी ताकद असते, असे ते म्हणाले. फक्त हातात झाडू घेऊन सफाई करायला लागणेच महत्त्वाचे नाही, तर पत्रकारांची लेखणी हीसुद्धा एक प्रकारची केरसुणी आहे, असंही त्यांनी म्हटलं. ही लेखणीसुद्धा स्वच्छतेचं साधन बनली आहे, अशी शब्दांत त्यांनी मीडियाचं कौतुक केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here