मुरूडच्या किनार्‍यावर दुर्मिळ काटेरी केंड मासा आढळला

0
920

मुरूडच्या किनार्‍यावर दुर्मिळ काटेरी केंड मासा आढळला

मुरूडच्या समुद्र किनार्‍यावर काल सायंकाळी अत्यंत दुर्मिळ जातीचा काटेरी केंड नावाचा मासा आढळून आला आहे.घुबडा सारखे तोंड असणारा आणि अंगावर काटे असणारा हा मासा वादळापुर्वी किनार्‍या जवळ येत असल्याचे स्थानिक मच्छिमारांचे म्हणणे आहे.41 सेंटीमिटर लांब आणि 24 सेंटीमिटर रूंद असा हा मासा असून त्याच्या पाठीवर काटे आहेत.इंग्रजीत या माशाला पफर फिश म्हणून संबोधले जाते.या माशाचे वास्तव्य खोल समुद्रात असते.माशाचे दात एवढे मजबूत असतात की,जाळी सहज तोडून तो पलायन करू शकतो.23 जुलै 1989 रोजी समुद्रात अचानक तुफान आले , तत्पुर्वी समुद्र किनार्‍यावर असेच काटेरी केंड आढळून आले होते.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here