मुक्काम पाटण
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी होते.त्यातून किती वाचन संस्कृती वाढली आणि या संमेलनाचा किती लाभ झाला हा वादाचा विषय असला तरी ग्रामीण भागात अनेक गावात स्थानिक पातळीवर साहित्य संमेलनं भरवून वाचन संस्कृती रुजविण्याचे प्रामाणिक प्रयत्न होत आहेत..ते कौतुकास्पद आहे.अशा प्रयत्नांना हातभार लावणे ‘मराठी भाषा टिकली पाहिजे आणि वाचन संस्कृती रूजली पाहिजे’ असे ज्यांना वाटते त्यांचे कर्तव्य आहे .बीड जिल्हयातील शिरूर कासार आणि सातारा जिल्हयातील पाटण अशा छोटया गावात झालेल्या साहित्य संमेलनात मला सहभागी व्हायची संधी मिळाली..संयोजकांचं कौतूक वाटलं.कारण सार्याच गोष्टीची अडचण असतानाही ही मंडळी खंड पडू न देता संमेलनं दरवर्षी भरवत आहेत… पाटण येथील साहित्य संमेलनाचा समारोप माझ्या हस्ते झाला.समारोपाचा कार्यक्रम असतानाही रसिक पाटणकरांनी संमेलनास गर्दी केली होती.विक्रमबाबा पाटणकरांनी नेटकं आयोजन केलं होतं.पाटणची पत्रकार मंडळी देखील संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करीत असते..सामाजिक कार्याबरोबरच तालुका पत्रकार संघ साहित्याच्या क्षेत्रातही आपआपल्यापरीनं काम करीत आहेत याचा मनस्वी आनंद मला झाला..पाटणच्या पत्रकार मित्रांनी आपुलकीनं केलेलं माझं स्वागत आनंद देणारं होतं.पाटणच्या मित्रांनो धन्यवाद…