महामार्गाबद्दल मुग गिळून का?

0
824

जैतापूर होणारच च्या घोषणा देणारे
मुंबई-गोवा महामार्गाबद्दल मुग गिळून का आहेत
दोन दिवस रायगडात होतो.अलिबाग,माणगाव,रोहा,पनवेल असा प्रवास झाला.ज्या महामार्ग रूंदीकरणासाठी आम्ही पाच वर्षे रस्त्यावर उतरून आंदोलन केलं त्या रस्त्यावरून प्रवास केला.गेल्या सहा महिन्यापासून रस्ता रूंदीकरणाचं काम ठप्प असल्यानं ठिकठिकाणी राडा-रोडा पडलेला,रस्ते उखडलेले,डायव्हर्शन्समुळं वाहतूक खोळंबलेली असं चित्र दिसलं.त्यामुळं अपघातांचे प्रमाण जवळपास दुप्पट वाढले आहे.माणसं मरताहेत,जखमी होताहेत.सरकार बेफिकीर आहे.रस्त्याची अवस्था अशी झालीय की,पनवेल ते वडखळ या साठ किलो मिटरच्या प्रवासासाठी सहज दोन तास लागतात.पेण ते वडखळ हा प्रवास तर नकोसा होतो.वडखळला चहा घ्यायला थांबलो तर मला ओळखणारे एक गृहस्थ आले आणि म्हणाले,कश्याला रस्ता रूंदीकऱणासाठी लढा दिलात होता तो रस्ता ठीक होता.जनतेला आज जो त्रास होतोय तो तरी होत नव्हता.रस्तांची आणि एकूण वाहतुकीची अवस्था बघितली तर मलाही वाटायला लागलं खरंच अगोदर होता तोच रस्ता ठीक होता.पण आता इलाज नव्हता.मागं सरकरणंही शक्य नव्हतं.पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचं काम 30 टक्के झालं आहे.नवं सरकार सत्तेवर आलं आणि ते काम अचानक बंद पडलं.त्यानंतर बांधकाम मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी 31 मे पूर्वी रस्त्यावरील खड्डे भरण्याचं,रस्ते किमान पर्ववत कऱण्याचं आश्वासन दिलं.काम व्यवस्थित सुरूय की,नाही ते पाहण्यासाठी दरमहा आपण महामार्गाला भेट देऊ असंही सांगितलं.यापैकी काहीच झालं नाही.आता पावसाळा आलाय.पावसाळ्यात रस्त्याचं काय होणार सांगता येत नाही.
एकीकडं नितीन गडकरी लाखो रूपयांच्या महामार्गाच्या निर्मितीच्या घोषणा करीत आहेत आणि दुसरीकंडं कोकणातून जाणारा एकमेव महामार्गही दुरस्त होत नाही.हा विरोधाभास चीड आणणारा आहे.अशा स्थितीत सरकारला पुन्हा एकदा धक्का देण्यासाठी काही कऱणं आवश्यक होतं.रोहयात गेल्यावर तेथे रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पेऱणे आणि इतर पत्रकारांशी चर्चा केली.त्यातून आता वडखळ ते पेण असा लॉंगमार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.15 जून रोजी हा लॉंगमार्च निघणार आहे.या आंदोलनाची आखणी केली जात आहे.
खरं तर एका विषयासाठी सातत्यानं पत्रकारांना रस्त्यावर उतरावे लागत आहे ही सरकारसाठी चांगली गोष्ट नाही.अच्छे दिनचं चॉकलेट दाखविणाऱांसाठी तर नक्कीच नाही.परतू कोकणाचं दुर्दैव असंय की इथं झगडल्याशिवाय काहीच मिळत नाही.मुंबई-नाशिक,मुंबई-अहमदाबाद,मुंबई-पुणे तसेच पुणे-कोल्हापूर,पुणे-औरंगाबाद,पुणे -सोलापूर हे रस्ते एवढ्यासहजपणे चौपदरी झाले की,कोणाला कळलंही नाही.भूसंपादनाचाही विषय अगदी सहज सोडला गेला.पुणे-नाशिक महामार्गाचं काम मुंबई-गोवानंतर सुरू झालं पण ते ए़वढं वेगात सुरूय की,तेही लवकरच पूर्ण होईल.इकडं काहीच अडचणी येत नाहीत मग कोकणातच भूसंपादन होत नाही वगैरे थापा मारल्या जातात.पहिल्या टप्प्यासाठी केवळ 290 हेक्टर भूसंपादन करायचंय.केवळ 700 शेतकऱ्यांचा प्रश्नय.त्यांना योग्य ते पॅकेज देऊन सरकार हा प्रश्न का सोडवत नाही असा प्रश्न पडू शकतो.या प्रश्नाचं उत्तरंय सरकारचा नकारात्मक दृष्टीकोन.कोकणासाठी काही करायची सरकारची तयारीच नाही.जैतापूर होणारच अशा घोषणा बेंबीच्या देढापासून कऱणाऱ्या सरकारला मुंबई-गोवा महामार्ग होणारच हे बोलतानंा अडखळळ्यासारखं होतंय हे आम्ही गेले अनेक दिवस अनुभवतो आहोत.( एसएमः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here