Thursday, May 13, 2021

मुंबई-गोवा चौपदरीकऱण करावेच लागेल

येत्या दोन ते चार वर्षांत मुंबई आणि पुणे परिसरातील विविध नॅशनल हायवे, नवी मुंबई आणि पुण्यातील विमानतळ, रायगडमधील दिघी बंदर आदी तब्बल नऊ महत्त्वपूर्ण विकासकामे पूर्ण होणार असून तेथील वाहनेही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा वापर करणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. या नवीन प्रकल्पांमुळे वाढणाऱ्या वाहतुकीचा सामना करण्याचे आव्हान मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेपुढे उभे आहे. त्यामुळे या मार्गाच्या विस्ताराचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट हा मार्ग सहा पदरी आहे. मात्र १० पदरी मार्गाएवढी वाहतुकीची वर्दळ येथे असते. आधीच प्रचंड वाहतुकीचा ताण असताना दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतूक कोंडीत भरच पडते. त्यातच, सध्या मुंबई आणि पुणे परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. ही विकासकामे पूर्ण झाल्यानंतर साहजिकच एक्स्प्रेस वेचा वापर आणखी वाढणार आहे.

नॅशनल हायवे क्र. ४ हा पुण्याच्यापुढे बेंगळुरूपर्यंत (पश्चिम वळण रस्त्यासह) सहा पदरी करण्यात येत आहे. दहीसर ते सुरत हा एनएच-८ हादेखील सहापदरी करण्यात येत आहे. पुणे-नाशिक एनएच-५०, पुणे- सोलापूर एनएच-९, मुंबई- गोवा एनएच-१७ यांसह पुणे औरंगाबाद रस्ता व वडगाव चाकण शिक्रापूर रस्ताही चार ते सहा पदरी करण्यात येत आहे. चाकण, लोणंद, फलटण, बारामती, शिरवळ या औद्योगिक क्षेत्रातील रस्ते चौपदरी करण्याचे काम सुरू आहे. जेएनपीटी ते एनएच४ रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामाचे टेंडर लवकरच निघणार आहे.

नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळामुळे पुणे ते नवी मुंबई मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढेल, असा निष्कर्ष एमएसआरडीसीने काढला आहे. तर मुंबई ट्रान्सहार्बर लिंक व चाकण विमानतळ हे दोन्ही प्रकल्पही हाती घेतले जाणार आहेत. त्याशिवाय, या वर्षी सुरू होण्याची अपेक्षा असलेल्या आणि मुंबई-पुणे कॉरिडॉरपासून फक्त ५० किमीवर असलेल्या रायगड येथील दिघी बंदरामुळेही एक्स्प्रेस वेवर वाहतूक वाढण्याचा अंदाज आहे.

वाढता वाढता वाढे

१९९७ साली ६० हजार वाहने एक्स्प्रेस वेवर धावत होती. २००४ साली हा आकडा एक लाखाच्या घरात गेला आहे.

दरमहा वर्दळ (नोव्हेंबर २०१४ची आकडेवारी)

कार ८ लाख ५० हजार ३५५

ट्रक १ लाख ७१ हजार ९५५

बस ७१ हजार ५३४

मोठे ट्रक ६७ हजार ६५९

कंटेनर ७२ हजार ९७७

एकूण वाहने दरमहा – १३ लाख २० हजार १४६

दरवर्षी १ कोटी ५८ लाख ४१ हजार ७५२

मटावरून साभार

Related Articles

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

वेदनेचा हुंकार

वेदनेचा हुंकार एक मे हा दिवस प्रचंड तणावात गेला.. तणाव उपोषणाचा किंवा आत्मक्लेषाचा नव्हताच.. मोठ्या हिंमतीनं, निर्धारानं अशी शेकड्यांनी आंदोलनं केलीत आपण.. ती यशस्वीही केलीत.....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,948FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

वेदनेचा हुंकार

वेदनेचा हुंकार एक मे हा दिवस प्रचंड तणावात गेला.. तणाव उपोषणाचा किंवा आत्मक्लेषाचा नव्हताच.. मोठ्या हिंमतीनं, निर्धारानं अशी शेकड्यांनी आंदोलनं केलीत आपण.. ती यशस्वीही केलीत.....

पुन्हा तोंडाला पाने पुसली

सरकारने पत्रकारांच्या तोंडाला पुन्हा पुसली मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये होईल अशी जोरदार चर्चा मुंबईत होती पण...

पता है? आखीर माहौल क्यू बदला?

पता है? आखीर माहौल क्यू बदला? अचानक असं काय घडलं की, सगळ्यांनाच पत्रकारांचा पुळका आला? बघा दुपारनंतर आठ - दहा नेत्यांनी पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून...
error: Content is protected !!