उबरमधये महिला पत्रकाराला मारहाण उबर टॅक्सीत सहप्रवासी असलेल्या एका महिलेने पत्रकार महिलेस मारहाण केल्याची घटना घडली. पत्रकार उष्णोता पॉल असे महिला पत्रकाराचे नाव आहे. उशिराने सोडल्याचा रागातून आरोपी महिलेने आपल्याला मारहाण केली. तिच्याविरोधात आपण लोअर परळ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे, असं उष्णोताने सांगितलं.

आज सकाळी आपण उबरची शेअर कॅब पकडली. कॅबमधील एक महिला आधीपासूनच रागात होती. जास्त पैसे घेऊनही आपल्याला शेवटी सोडणार असल्यावरून ती महिला कॅब चालकाशी वाद घालत होती. हा वाद सोडवण्याच्या प्रयत्नात मलाच मारहाण झाली, असं पत्रकार उष्णोताने सांगितलं. आरोपी महिलेने माझे केस ओढले. चेहऱ्यावर नखांनी बोचकून घाव केला. हातातूनही रक्त आलं. तसंच आपल्याविरोधात महिलेने अपशब्दही वापरले. आपण महिलेचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला. पण तिने मोबाइल तोडण्याची धमकी दिली, असं उष्णोताचं म्हणणं आहे.
उबर इंडियाने आरोपी महिलेची माहिती देण्यास नकार दिला. उबर पोलिसांना मदत करत नाहीए, असा आरोप पत्रकार उष्णोताने केला. तर या प्रकरणी काम सुरू आहे. पीडित महिलेशी आम्ही ईमेलवर संपर्क करू, असं ट्विट उबरनं केलंय. तसंच या प्रकरणाची चौकशी करत असल्याचं ट्विट पोलिसांनी केलंय.

मटा ऑनलाईवरून साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here