टाइम्स नाऊचे पत्रकार हरमन
हल्ल्यात गंभीर जखमी
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने केला निषेध
मुूंबईः मुंबईतील ‘टाइम्स नाऊ’चे पत्रकार हरमन गोम्ज यांच्यावर काल रात्री गावदेवी पोलीस स्टेशनजवळ चार जणांनी जीवघेणा हल्ला केला.हरमन गंभीर जखमी झाले आहेत.त्याच्या डोळ्याला इजा झाली आहे.हरमन यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचं म्हटलं आहे.त्यांनी माझ्यावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला केला असंही हरमननं पोलिसांना सांगितलं आहे ‘मारेकरी मला ठार करण्यासाठीच आले होते माझ्या शरीरावर जखमा झाल्या आहेत,डोळ्याला दुखापत झाली आहे.माझ्या कोणत्या स्टोरीमुळं माझ्यावर हा हल्ला झाला माहिती नाही पण आतापर्यंत पूर्णखात्री करूनच स्टोरीज दिल्याचं हरमन यांनी स्पष्ट केलंय.हरमन यांच्या डोळ्याला सहा टाके पडले आहेत.या हल्लयामुळं हरमन यांचं कुटुंब भितीच्या सावटाखाली आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेने या हल्ल्याचा तीव्र शब्दात धिक्कार केला असून हल्लेखोरांना तातडीने पकडण्यात यावे अशी मागणी केली आहे.
सरकार पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याने राज्यातील पत्रकारांवर हल्ले वाढले आहेत.गेल्या तीन दिवसात तुळजापू,पुणे आणि आता मुंबईतील तीन पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.सरकारनं तातडीनं कायदा अंमलात आणला नाही तर पुन्हा एकदा कायद्यासाठीचं आंदोलन तीव्र करावं लागेल असा इशारा एस.एम.देशमुख यांनी दिला आहे.विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील या हल्लयाचा निषेध केला आहे.

LEAVE A REPLY