मुंबईचा आरसा फुटला..

0
2158

पुणे मिरर बंद होणार,मुंबई मिरर साप्ताहिक होणार..

कोरोनानं आणलेल्या लॉकडाऊनचा लाभ उठवत साखळी वृत्तपत्रांच्या मालकानी आपल्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांना लॉक लावण्याचा सपाटाच सुरू केलाय..या मालिकेत आता टाइम्स ग्रुप देखील मागे नाही.टाइम्सनं आज एक निवेदन काढून मुंबई मिरर हे सायंदैनिक बंद करून ते साप्ताहिक स्वरूपात सुरू करण्याचा आणि पुणे मिररच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय जाहीर केलाय.कारण तेच..कोरोनामुळे वृत्तपत्र व्यवसाय कसा अडचणीत आणि टपघाईस आलाय ,त्यामुळे वृत्तपत्रांचे प्रकाशन सुरू ठेवणं किती अवघड झालंय वगैरे वगैरे…पण मग तुमच्यावर अवलंबून असणार्‍या हजारो कुटुंबांनी जायचं कुठं ?..कारण टाइम्सच्या निवेदनात पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचार्‍यांचं काय कऱणार याचा उल्लेख दिसत नाही.याचा अर्थ या सर्वांना तुटपुंजी रक्कम देऊन टाइम्स ग्रुप रस्त्यावर आणू पहात आहे.टाइम्सनं या अगोदर महाराष्ट्र टाइम्सच्या काही आवृत्या बंद केल्या आहेत.दैनिकाची पानं,पुरवण्याही कमी केल्या आहेत.याचा थेट फटका तेथे काम करणारया पत्रकारांना बसला आहे.सरकारनं याविषयात तातडीने लक्ष घालण्याची गरज आङे असं आम्हाला वाटतं.
मुंबईत अनेक वृत्तपत्रांनी जवळपास फुकट वाटाव्यात अशा नाममात्र दरानं सरकारकडून जमिनी लाटल्या आहेत.त्यांना आता दैनिकं बंद करून या मोक्याच्या जागांवर कमर्शिल कॉम्प्लेक्स उभे करायचे आहेत.ज्या कारणांसाठी सरकारनं जमिनी दिल्या त्या कारणांसाठी त्या वापरल्या जाणार नसतील तर त्या परत घेता येऊ शकतात..आवृत्या बंद करून पत्रकारंना रस्तयावर आणणार्‍या वृत्तपत्रांच्या जमिनी सरकारनं काढून तर घेतल्या पाहिजेतच त्याचबरोबर त्यांना दिल्या जाणार्‍या सवलती आणि जाहिराती देखील बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला पाहिजे.अनेक भांडवलदारी वृत्तपत्रांनी सुप्रिम कोर्टाचा आदेश असताना देखील मजिठिया वेतन आयोगाची अंमलबजावणी केली नाही.आता ती करण्याचा तर प्रश्‍नच नाही.ती मागणी पुन्हा होण्यापुर्वीच मालकांनी वृत्तपत्रे बंद करण्याचा सपाटा लावला आहे..टाइम्सकडून तरी ही अपेक्षा नव्हती..

टाइम्सनं काढलेल्या निवेदनाचा काही भाग..

All mirror editions closing including Mumbai Mirror

Times Group statement

Fifteen years ago, the ‘city that never sleeps’ had a new and good reason for staying awake – and for waking up, when it did manage to get some sleep: Mumbai Mirror. Feisty and fearless, energetic and enthusiastic, playful yet punchy, it lived up to its name from the day it was born, mirroring Mumbai in all its myriad moods. It was as local as Mumbai’s locals – the lifeblood that keeps the city on track and moving. The paper became such an integral part of the reader’s life, driving the narrative of the city, that it was decided to extend the experience to Bengaluru, Pune and Ahmedabad.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here