रायपूर ः दूरदर्शनच्या कॅमेरामनची हत्त्या करणार्‍या नक्षलींनी आज खुलासा केलाय.ते म्हणतात,आम्हाला अच्युतानंद साहूला मारायचं नव्हतं.चकमकीच्या वेळेस तो तीथं असल्यानं त्याला गोळी लागली.त्यात त्याचा मृत्यू झाला.मिडियाला टार्गेट करायचा आमचा हेतू नव्हता. असा दावाही नक्षलवाद्यांनी केलाय.छत्तीसगढमधील दंतेवाडा भागात दूरदर्शनच्या कॅमेरामनची नक्षलीनी हत्या केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद जगभरातील माध्यमात उमटले.त्यामुळे नक्षलींची बदनामी होत असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांनी हा लेखी खुलासा केलाय.या घटनेनंतर आमच्या पक्षाच्या विरोधात दुप्प्रचार केला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.
मिडियाने या भागात स्वतंत्रपणे यावं,पोलिसांना सोबत घेऊ नये..विधानसभा निवडणुकीच्या काळात याची दक्षता घेतली जावी ..आमची मिडियाला विरोध नाही पण त्यांनी पोलिसांसोबत येऊ नये अशी विनंती त्यांनी पत्रकाव्दारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here