डॉ.गणेश मुळे कोकण भवनला ष
अहंकारी पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी
माहिती आणि जनसंपर्क विभागातील काही अधिकार्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आङेत.
माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांची बदली कोकण विभागीय उपसंचालक म्हणून करण्यात आली आहे.
भंडार्याच्या माहिती अधिकारी मनिषा साबळे यांना वर्ध्याला पाठवण्यात आले आहे.
चंद्रपूरचे र.बा.गीते हे आता भंडार्याचे माहिती अधिकारी असतील
पुणे येथील माहिती अधिकारी र.पा.राऊत यांची बदली सोलापूरला करण्यात आली आहे तर सोलापूरचे गोविंद अहंकारी पुण्याचे नवे माहिती अधिकारी असतील.
सु।अ.सोनट्क्के यापुढे लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी असतील यापुर्वी ते हिंगोलीत होते.
प्रे.जि गडेकर यांची वर्ध्याहून नागपूरला बदली केली गेली आहे.
त्याच बरोबर मीनल जोगळेकर आणि क्रि.अ.लाला यांच्याही बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
या बदल्या करण्यात आलेल्या असल्या तरी अजय आंबेकर यांची कोठे पोस्टिंग केली गेलीय ते मात्र अजून समजलेले नाही.गेली महिना-दीड महिना ते पोस्टिंगची वाट बघत आहेत.