माहिती अधिकार कार्यकर्त्यांची गुप्तहेर खात्याकडून चौकशी

0
947

मुंबई, पुण्यासह विविध राज्यांच्या राजधानीच्या शहरांमधील माहिती अधिकार कार्यकर्त्यांची गुप्तहेर खात्याने चौकशी सुरू केली आहे. या कार्यकर्त्यांनी कोठून प्रशिक्षण घेतले, कोणत्या विषयावर काम केले, त्यांची आर्थिक स्थिती आदी बाबींची माहिती गुप्तहेर खात्यामार्फत गोळा करण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीने माहिती आयुक्तपदासाठी अर्ज केला असेल, तरच त्याची गुप्तहेर खात्याकडून चौकशी करण्यात येते. आता मात्र माहिती अधिकार कार्यकर्त्यांचीही ‘कुंडली’ बनवली जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, ही सर्व माहिती दिल्लीत संकलित करण्यात येणार असून माहिती अधिकार कायद्याची दिशा ठरविण्याकरिता ही माहिती गोळा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तहेर खात्याने मुंबईतील कार्यकर्त्यांशी संबंधित सर्व माहिती गोळा केली आहे. पुण्यात चळवळीत सक्रिय असलेल्यांकडून गुप्तहेर खात्याने ही माहिती जमवली. दुसरीकडे दिल्लीत १६ व १७ ऑक्टोबरला होत असलेल्या माहिती अधिकारविषयक परिसंवादाचे निमंत्रणही या चळवळीतील अनेक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले नसल्याचे समजते. केंद्रीय माहिती आयोगाने केवळ अरुणा रॉय, निखिल डे, शेखर सिंह, निखिल भारद्वाज, व्यंकटेश नायक व लोकेश बत्रा यांनाच निमंत्रण दिले आहे. या सर्वानी देशभरातील अनेक कार्यकर्ते तसेच स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेण्याची विनंती केंद्रीय माहिती आयोगास केली होती. मात्र आयोगाने ती धुडकावून लावली.

(लोकसत्तावरून साभार )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here