माझी जन्मभूमी मराठवाडा असली तरी जवळपास वीस वर्षे मी कोकणात होतो. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही जिल्हयात मी प़चंड भटकंती केली. सारा कोकणच निसर्ग संपन्न असला तरी इथली अनेक गावं कायमची मनात घर करून बसलेली आहेत. अलिबागमधये असताना कंटाळा आला की, नागाव बिचवर जाऊन तासंतास निसर्ग अनुभवाचो. खाली रत्नागिरीला आलो की, गणपतीपुळे ठरलेलं असतं. मात्र गणपतीपुळेतील शांतता आता राहिली नाही. पण शांतता, निसर्ग आणि कोकणातील ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घ्यायचं असंल तर पुळे पासून दोन किलो मिटर वर असलेल्या मालगुंडला मुद्दाम गेलं पाहिजे. मी दरवेळा जातो. मालगुंड हे केशवसुतांचं गाव आहे. तिथं त्यांचं स्मारक ही आहे.. ते स्मारक पहायला काही जण चुकून माकून येतात.. पण माझं आकषॅण मात्र निसर्गाच्या कुशीत विसावलेलं हे संपूर्ण गाव असतं.. झाडं जाऊन सिम्ंटचं जंगल वाढत आहे. ते येथेही जाणवू लागलं असलं तरी.. आजही अनेक गदॅ नारळी पोफळीच्या बागांमधून सुखेनैव आपलं अस्तित्व टिकवून असलेली कौलारू घरं दिसतात.. आंब्यांची असंख्य झाडं, आकाशाशी स्पर्धा करणारी इतरही अनेक उंचच उंच झाडं.. गावातली छोटे – छोटे, अरूंद रस्ते, रस्त्याच्याकडेला, बाजार किंवा राजकारणावर गप्पा मारणारा साधा भोळा कोकणी माणूस हमखास येथे दिसतो. स्वच्छ अंगण, टापटीप घरं आणि या घरात कायम काय॓ मग्न असलेल्या,माता भगिनी हे सारं कोकणच्या वैभवाची साक्ष देणारं असतं.. त्यामुळे गाडीतून का होईना मी मालगुंड गावातून एकदोन फेरया नक्कीच मारतो. केशवसुत स्मारकाचा परिसर नैसर्गिकदृषटया संपन्न असला तरी स्मारक पाच मिनिटात पाहून होतं.. यंथं करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.. बाहेरची मंडळी स्थानिकांना विश्वासात घेत नसावी असं दिसतं.. कोकणानं देशाला अनेक मोठी माणसं दिली. या माणसांचं मोठेपण जगानं जाणलं पण ते महाराष्ट सरकारला जाणवलं नाही.. या मोठ्या माणसांची समारकं व्हायला हवीत.. ती होत नाही असं झालं तर बुध्दी, शौयाॅचा सुंदर मिलाफ झालेला हा परिसर येणारया पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहिलं ते होत नाही. . आमच्या बाळशास्त्री जांभेकरांचया समारकाचं भिजत घोंगडे लालफितीत अडकून पडलं आहे. या पाश्र्वभूमीवर कोमसापनं पुढाकार घेऊन स्मारक उभारलं हे कौतूकास्पद खरचं.. पण गणपतीपुळेला येणारा प्रत्येक पयॅटक मालगुंडला येईल असं हे भव्य दिव्य स्मारक व्हायला हवं.. सरकारनं त्यासाठी प़यतन करावेत.. आज या स्मारकात ॓एक तुतारी द्या मज आणूनि’ ही कविता वाचताना मनोमन हेच वाटत होतं. किरण नाईक, सुनील वाळूज, स्वप्निल या मित्रांची भावना यापेक्षा वेगळी नव्हती..
आज मी कोकणात राहात नाही पण मनाला भूरळ घालणारा हा कोकण मला कायमचा हवाहवासा वाटत असतो. त्यामुळंच कोकणात येण्याची एकही संधी मी सोडत नाही. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला असतानाही अधिस्वीकृती समितीची बैठक आणि मराठी पत्रकार परिषदेच्या रत्नागिरी शाखेची बैठक असल्यानं रत्नागिरीला आलो.. जो निसर्ग अनेकदा पाहिली.. तो आजही पाहिला पण प्रत्येक वेळी हा निसर्ग मला नवा वाटला. आजही तीच माझी मनोवस्था होती.. येवा कोकण आपलोच असा या वाक्यातला उपहास सोडा.. मात्र खरंच कोकण नेहमीच आपलाच अाहे अशीच माझी भावना असते..आज येथून परतताना नेहमी प़माणे मी नवा उत्साह घेऊन जात आहे…