राज्यातील दैनिकं आणि साप्ताहिकांच्या व्दैवार्षिक पडताळणाचा विषय न्यायालयीन निकालानंतर तात्पुरता संपला असला तरी या वर्गाचे इतरही अनेक विषय गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत.त्यावर चर्चा करून ठोस कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी राज्यातील दैनिकं आणि साप्ताहिकांच्या मालक संपादकांची एक बैठक उद्या दिनांक 8 जुलै 2017 रोजी पुणे येथील वानवडी परिसरात असलेल्या जांभूळकर गार्डन येथे आयोजित केली आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकाराने प्रथमच होत असलेल्या या बैठकीसाठी राज्यातील मालक-संपादकांनी मोठया संख्येनं उपस्थित राहावे अशी विनंती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस,एम.देशमुख यांनी केली आहे.दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाने या बैठकीचे आयोजन केले आहे.जांभूळकर गार्डन हे वानवडी परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवन इमारतीच्या समोर आहे.स्वारगेटहून हडपसरकडे जाणार्‍या बसने फातिमा नगर स्टॉपवर उतरून जांभूळकर गार्डनकडे येता येईल.कात्रज ते हडपसर या बसनेही वानवडीत येता येईल..रेल्वे स्टेशन तसेच शिवाजीनगरहून हडपसरकडे बसेस आहेत.
काही अडचण आल्यास खालील मोबाईलवर संपर्क करता येईल.
 
शरद पाबळे ( पुणे विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषद) ९८२२०८३१११
सुनील वाळुंज ( पुणे शहर सचिव ) ९८२२१९५२९७
बापुसाहेब गोरे ( अध्यक्ष पुणे जिल्हा पत्रकार संघ ) ९८२२२२२७७२
कृष्णकांत कोबल ( कार्याध्यक्ष,ुपुणे जिल्हा पत्रकार संघ) ९८८१०९८३८०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here