‘माध्यम ‘धमाक्यानं’ जग हादरलं..

0
993

अभिनंदन दैनिक सुदर्दोइस झायटुंग

गभरातील सरकारांना जे जमलं नाही ते जगातील 96 नामांकित माध्यम समुहांनी एकत्र येत करून दाखविलं.त्यांनी असा काही धमका केला आहे की,त्यात भारतातील 714 धनिकांचे बुरखे तर फाटले आहेतच त्याच बरोबर करबुडवेगिरी करून जमविलेल्या संपत्तीची 1.34 कोटी गोपनिय कागदपत्रेही जगासमोर आली आहेत.जगातील काही प्रमुख मिडिया हाऊसेसनी एकत्र यायचं आणि शोध पत्रकारितेच्या माध्यमातून बदमाशांना उघडे पाडायचे ही कल्पनाच भन्नाट आहे.जर्मनीतील सुदर्दोइस झायटुंब या वृत्तपत्राच्या पुढाकाराने राबविलेल्या या मोहिमेत जगातील नामांकित 96 माध्यम समुहांनी यात भाग घेतला आणि पॅराडाईज पेपर्सच्या नावाने मोठा धमका केला.त्यानं जग हादरून गेलंय.या मोहिमेत इंडियन एक्स्प्रेसचा सहभाग होता.वर्तमानपत्रांच्या नावानं बोंबा मारण्याची हल्ली फॅशन असली तरी वर्तमानपत्रे आपलं काम चोखपणे बजावत आहेत हे यातून दिसून आलं आहे. पॅराडाइज पेपर्स मोहिमेत सहभागी झालेल्या जगभरातील 96 वृत्तपत्रांचे आम्ही मनःपूर्वक अभिनंदन करीत आहोत.
भारतातील नोटाबंदीनं मोठा काळा पैसा बाहेर आला असे ढोल वाजविणार्‍या आणि नोटाबंदी वर्षपूर्ती निमित्त अ‍ॅन्टी ब्लॅक मनी डे साजरा करू पाहणार्‍या भारत सरकारला पॅराडाइज पेपर्सनं मोठा दणका लगावला आहे.या अगोदर गेल्या वर्षी पनामा पेपर्समधून 500 भारतीय करबुडव्यांचे चेहरे जगासमोर आले होते.

या संदर्भात लोकसत्तानं जी बातमी दिली आहे ती लोकसत्ताच्या सौजन्यानं येथे देत आहोत.

नोटाबंदीच्या वर्षपूर्ती निमित्त ‘अँटी ब्लॅक मनी डे’ साजरा करण्याची तयारी केंद्र सरकारने केली असतानाच ‘पॅराडाईज पेपर्स’ उजेडात आले आहे. ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये बोगस कंपन्यांचा खुलासा करण्यात आला असून या कंपन्यांचा वापर जगातील श्रीमंत मंडळी परदेशात पैसे पाठवण्यासाठी करत होती. यामध्ये भारतातील दिग्गज नेते, सिनेसृष्टीतील कलावंत आणि उद्योजकांचे नावही समोर आले आहे.

जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने भारतातील इंडियन एक्स्प्रेससह जगातील ९६ नामांकित माध्यमसमूहांनी ‘पॅराडाईज पेपर्स’चा खुलासा करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये भारतातील ७१४ जणांचा समावेश आहे. कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बर्म्युडामधील ‘अॅपलबाय’ या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची १३. ४ दशलक्ष कागदपत्रे उघड करण्यात आली आहे.

बर्म्युडामधील अॅपलबाय आणि सिंगापूरमधील एशियासिटी या कंपन्यांनी करनंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १९ ठिकाणांवरुन स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा फिरवल्याचा गौप्यस्फोट ‘पॅराडाईज पेपर्स’मधून करण्यात आला आहे.  त्यातून जागतिक राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, चित्रपट कलावंतांनी आपली मालमत्ता लपवली आणि कर चुकवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. ७१४ भारतीयांचा या यादीत समावेश असून ‘पॅराडाईज पेपर्स’मधील १८० देशांच्या यादीत भारत १९ व्या स्थानी आहे. नागरी हवाई राज्यमंत्री जयंत सिन्हा, अमिताभ बच्चन, विजय मल्ल्या, नीरा राडिया, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांच्यासारख्या ख्यातनाम मंडळींचा यात समावेश आहे. अमिताभ बच्चन यांचे बर्म्यूडामधील एका कंपनीत समभाग असल्याचा धक्कादायक खुलासाही झाला आहे.

जागतिक पातळीवर अमेरिकेतील उद्योग मंत्री विलबर रॉस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासाठी निधी संकलन करणाऱ्यांचे नावही या यादीत आहे. याशिवाय ट्विटर आणि फेसबुकमध्ये रशियातील कंपन्यांची गुंतवणूक केल्याचा उल्लेखही या पेपर्समध्ये आहे.

एप्रिल २०१६ मध्ये ‘पनामा पेपर्स’ प्रकरण उघड झाले होते. यामध्ये ५०० भारतायींची नावे होती. या प्रकरणात केंद्र सरकारने चौकशीला सुरुवात केली होती. आता ‘पॅराडाईज पेपर्स’ हे प्रकरण उजेडात आल्याने केंद्र सरकार याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पनामा पेपर्स’मुळे जगभरातील श्रीमंतांची करचोरी आणि काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग उजेडात आल्यानंतर आता ‘पॅराडाईज पेपर्स’ प्रकरणामुळे जगभरात भूकंप झाला आहे. यामधून भारतसह जगभरातील अनेक बडे नेते, उद्योगपती, कलाकारांची नावे पुढे आली आहेत. यामध्ये भारतातील ७१४ जणांचा समावेश आहे. भारतातील अनेक बड्या कंपन्या आणि श्रीमंती व्यक्ती यांची करचोरी ‘पॅराडाईज पेपर्स’मधून उघडकीस आली आहे.

जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने जगातील ९६ नामांकित माध्यमसमूहांनी ‘पॅराडाईज पेपर्स’चा खुलासा करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. यामध्ये भारतातील ‘इंडियन एक्स्प्रेस’चा समावेश होता. कर बुडवेगिरी करुन तो पैसा देशाबाहेरील बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणाऱ्या भारतीय व्यक्तींच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम ‘इंडियन एक्स्प्रेस’ने पार पाडले. यासाठी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या प्रतिनिधीला १० महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला. यातील सर्वाधिक कागदपत्रे ही अॅपलबाय या विधीविषयक संस्थेशी संबंधित आहेत. ११९ वर्षे जुनी असलेली ही कंपनी म्हणजे वकील, अकाऊंटंट्स, बँकर्स आणि अन्य लोकांचे एक मोठे नेटवर्क आहे. या संस्थेकडून भारतासह जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली व्यक्तींचा पैसा ‘मॅनेज’ केला जातो. करचोरी केलेला पैसा देशाबाहेर पाठवून काळा पैशाचे रुपांतर पांढऱ्या पैशात करणाऱ्या भारतीयांची संख्या ७१४ इतकी आहे. यामध्ये भारत जगात १९ व्या क्रमांकावर आहे.

सर्वात मोठी ग्राहक असलेली कंपनी भारतीय आहे. या कंपनीचे नाव ‘सन ग्रुप’ असे असून, ती नंदलाल खेमका यांच्या मालकीची आहे. अॅपलबायच्या भारतीय ग्राहकांचा विचार केल्यास त्यामध्ये बड्या कंपन्या आणि अनेक श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. ‘पॅराडाईज पेपर्स’मधून केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा, बिग बी अमिताभ बच्चन, भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि उद्योगपती आर. के. सिन्हा, उद्योगपती विजय मल्ल्या, अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांची नावे पुढे आली आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा राजकारणात येण्यापूर्वी त्यांची ओमिड्यार नेटवर्कमध्ये भागीदारी होती, अशी माहिती ‘पॅराडाईज पेपर्स’मधून समोर आली आहे. तर अमिताभ बच्चन यांचे बर्म्युडामधील एका कंपनीत समभाग असल्याचे यातून उघड झाले आहे. याशिवाय भाजपचे राज्यसभेतील खासदार आर. के. सिन्हा यांनीदेखील करचोरी करुन पैसा परदेशात पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त तिच्या दिलनशी या जुन्या नाव्याने करचोरी करत असल्याचेही यातून उघडकीस आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here