माथेरानची रेल्वे पुन्हा सुरू होणार

0
678

माथेरानचे वैभव समजली जाणारी मिनी ट्रेन पुन्हा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.अमन लॉज ते माथेरान या दरम्यानच्या लोहमार्गाच्या दुरूस्तीचे आणि माथेरान स्थानकातील दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने मिनी ट्रेनची शिट्टी माथेरानच्या जंगलात पुन्हा घुमाणार असे संकेत मिळत आहेत.सलग दोन अपघात झाल्यानंतर माथेरानची मिनी ट्रेन मे 2016 पासून  अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आली होती.मात्र त्याचा मोठा फटका माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला बसल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनी ट्रेन पुन्हा सुरू करावी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता.मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील काही दिवसांपुर्वीच रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन माथेरान रेल्वे पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली होती.त्यानंतर आता रेल्वेच्या रूळ दुरूस्तीचे काम सुरू झाल्याने माथेरानकराच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.माथेरान रेल्वेला 110 वर्षांचा इतिहास आहे..–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here