माथेरानची राणी नव्या लूकमध्ये..

पर्यटकांचं आकर्षण असलेल्या नेरळ ते माथेरान दरम्यानच्या टॉय ट्रेनचा प्रवास आता अधिक वेगवान,अधिक आंनंदी आणि अधिक आरामात होत आहे.माथेरानच्या राणीच्या ताफ्यात पाचवे इंजिन आल्यानं गाडीचा वेग वाढणार आहे.त्याचबरोबर डब्याची संख्या वाढणार असल्यानं एकाच वेळी अनेक पर्यटकांना माथेराणच्या राणीतून सफर करता येणार आहे.पर्यटकांना दोन तासाच्या या प्रवासाचा पुरेपूर आनंद घेता यावा यासाठी रेल्वेचा लूक पूर्णपणे बदलण्यात आला आहे.माथेरानच्या वैभवाच्या अनेक खाणाखुणा असलेली चित्रे ,माथेरानची घोडस्वारी,पशु-पक्षी,माथेरानच्या बाजार पेठेची चित्रे गाडीच्या डब्यांवर रेखाटली गेली आहेत.पारदर्शक छत असलेले डबे गाडीला जोडण्यात आल्यानं सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेत पर्यटक माथेरानला पोहोचणार आहेत.गुरूवारी सकाळी पावणेसात वाजता नेरळ स्थानकातून सुटलेल्या व नवा साज ल्यालेल्या या गाडीचं माथेरानकरांनी आणि पर्यटकांनी जोरदार स्वागत केलं.पर्यटकांसाठी आणखी एक खूषखबर आहे.या गाडीला लवकरच एक वातानुकूलीत डबा बसविला जात आहे.त्यासाठी 500 रूपये भाडे आकारण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे.या डब्यात 16 आसणं असतील ..त्यामुळं उन्हाळ्यातही थंड वातावरणात या थंड हवेच्या ठिकाणाची सफर अधिक रोमांचंकारी ठरणारी आहे.राणीचा नवा लूकमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार असल्याचा विश्‍वास स्थानिकांनी बोलून दाखविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here