माझी नदी डबके झाली…

0
986

गावाकडं माझ्या शेताजवळून वाहणारी ही खडकाळ नदी आहे.कधी काळी बारमाही वाहणार्‍या या नदीत उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही मनसोक्त डुंबायचो.शेताच्या बांधाला लागूनच नदी असल्याने नदीतील पाण्यामुळं शेतातील विहिरही बाराही महिने डबडबलेली असायची.त्यावर बारा एकर जमिन आोलिताखाली यायची.कालौघात हे सारं बदललं.पाऊसमान कमी झाला,नदी आक्रसत गेली,दोन्ही बाजुंनी अतिक्रमणं होत गेली,आणि आज नदीची काय अवस्था झालीय हे आपण खालील छायाचित्रात पाहू शकता.मोठ्या नदीचं एक डबकं झालंय.परवा गावाकडं गेलो नदी ओलांडताना नदीशी जोडलेल्या अनेक आठवणी जाग्या झाल्या आणि फारच वाईट वाटलं.गावाकडं थोडा पाऊस झाल्यानं या नदीत थोडं पाणी दिसतंय.पावसाळा संपला की ही नदी आता थंबेभर पाण्यालाही मोताल असते.नद्याचं हे मरण नक्कीच दुःखद आणि पुढील पिढ्यांना रडायला लावणारं आहे.

जलसंधारण,नदी पुनरूज्जीवन आदि क्षेत्रात भरीव काम करणारे पत्रकार मित्र अतूल कुलकर्णी बीडला भेटले.नद्यांना पुन्हा जीवदान मिळावं यासाठी काही तरी केलं पाहिजे यावर चर्चा झाली.पुढील महिन्यात ते मांजरा परिक्रमा करणार आहेत मी त्यात सहभागी होणार आहे.अशाच काही प्रयत्न गावाकडच्या नद्याच्या बाबतीत करता येईल काय असा विचारही मनात येतोय.गावाला दोन नद्या आहेत.दोन्ही नद्याच्या संगमावर वसलेलं माझं देवडी हे गाव अत्यंत रमनीय आहे.परंतू नद्या मृतावस्थेत गेल्यानं गावात पाणी टंचाईपासून अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.मराठवाड्यात जलशिवारची चांगली काम झाल्याचं बोललं जातंय,मला वाटतं नद्याचं पुनरूज्जीवन हे काम अधिक महत्वाचं आहे.त्यासाठी सरकार आणि समाजानं प्रयत्न कऱण्याची गरज आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here