पोलिसांच्या अरेरावीचा प्रत्यय पत्रकारांना सातत्यानं येत असतो.नागपूरच्या महिला फोटो जर्नालिस्ट मोनिका चतुर्वेदी आणि लोकशाही वार्ताचे विनय निमगडे यांनाही पोलिसांच्या दबंगगिरीचा संतापजनक अनुभव आला.समता नगर भागात दोन भावांच्या झालेल्या खुनानंतर जमाव प्रक्षुब्ध झाला होता.त्यांना आवरण्यासाठी पोलिस जोरदार लाठीचार्ज करीत होते.पोलिसांच्या या अमानुषपणाचे चित्रण करणार्‍या मोनिका चतुर्वेदी आणि आणि विनय निमगडे यांच्याकडील कॅमेरा एका वरिष्ठ अधिकार्‍याने तर हिसकावून घेतलाच त्याचबरोबर त्यांनी मोनिका यांचा हातही पकडला.विनयची कॉलर त्यांनी पकडली.या अरेरावीने पत्रकार संतप्त झाले आहेत.हा अधिकारी एका मंत्र्यांच्या जवळचा असल्याचे सांगितले जात आहे.-

LEAVE A REPLY