सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीत राहणाऱ्या एका महिला पत्रकाराने उबर चालकावर तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. महिलेने टि्वटरवर पोलीस आणि उबर कंपनीला संबंधित चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अमृता दास ही महिला पत्रकार 19 मार्च रोजी आपल्या पतीसोबत उबेर कॅबमधून बाहेर जात होती. त्यावेळी तिने चालकाला एसी सुरू करायला सांगितले. पण त्याने दुर्लक्ष केले. त्यानंतर तिने त्याला पुन्हा एसी सुरू करण्यास सांगितले. यावर त्यांच्यात वाद झाला. त्याचदरम्यान तुला गरम होत असेल तर माझ्या मांडीवर बस असे अश्लाघ्य शब्द चालकाने वापरल्याचा आरोप महिलेने केला आहे.(सामनावरून साभार)

LEAVE A REPLY