नवी दिल्लीः शबरीमाला मंदिराचे दरवाजे उद्या सोमवारी उघडले जाणार आहेत.त्यासाठी केरळमधील राजकारण चांगलेच तापले आहे.पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.मागच्या वेळेस अनेक महिला पत्रकारांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.त्यावरून महिलांच्या मंदिर प्रवेशास विरोध करणारे आणि महिला पत्रकार यांच्यात चांगलेच वाद झाले होते.महिला पत्रकारांना मारहाण देखील केली गेली होती.या पार्श्‍वभूमीवर महिला पत्रकारांना वृत्तसंकलनासाठी पाठवू नये अशी तंबीच हिंदू संघटनांनी वृत्तसंस्थांना दिली आहे.या मुद्यांवर समर्थन वा विरोध करण्याचा अधिकार आम्हाला माहिती आहे.मात्र परिस्थिती चिघळेल असं तुम्ही काहीही करणार नाही अशी आशा आम्ही बाळगतो असे या संघटनांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY