मुंबईः #MeToo मोहिमेत आज एका महिला पत्रकारानं देखील आपल्या लैगिक शोषणाच्या विरोधात आवाज उठविला आहे.प्रसिध्द गायक कैलाश खेर यांनी आपल्याला चुकीच्या पध्दतीनं स्पर्श केल्याचा आरोप केला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलंय संबंधित महिला कैलाशच्या घरी मुलाखतीसाठी गेली असता ही घटना घडली.त्यावेळी तिच्यासमोबत आणखी एक महिला पत्रकार होती.ट्टिटरच्या माध्यमातून या महिला पत्रकाराने हा खुलासा केला आहे.
ट्टिटमध्ये म्हटलंय की,मुलाखत देताना कैलाश खेर आमच्या मांडीवर हात ठेवत होता.मुलाखत पटापट संपवून आम्ही दोघी तेथून बाहेर पडलो.माझ्या महिला पत्रकारास या घटनेबद्दल लिहियला सांगितलं होतं पण वृत्तपत्र बातमी छापणार नाही असं तिचं म्हणणं होतं.
मॉडेल ज्युल्फी सय्यदवरही या महिला पत्रकाराने आरोप केला आहे.क्रूज लाइनरवर मी आणि माझे काही पत्रकार मित्र गेलो होतो.त्यावेळी माझा फोन चार्जिंगला लावण्यासाठी मी जुल्फीच्या रूममध्ये गेले असता त्यानं मला बळजबरीनं कीस कऱण्याचा प्रयत्न केला.दुसर्‍या दिवशी जुल्फीनं माझी माफी मागितली असंही टिट्वटमध्ये म्हटलं गेलंय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here