महाड दुर्घटना ः शोध कार्याला आज सकाळपासून पुन्हा आरंभ होणार

0
807

महाड दुर्घटनेतील बेपत्ता गाड्यांचा शोध घेण्याचे काम आज सकाळपासून पुन्हा सुरू होत आहे.कोसळत असलेला पाऊस आणि अंधारामुळे काल सायंकाळी सहा वाजता शोध कार्य थांबविले गेले होते.शोध कार्य थांबविण्यात आले तेव्हा दुर्घ
दुर्घटनेला अठरा तास उलटून गेले होते तरीही शोध पथकांच्या हाती काहीही लागले नाही.दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दोन मृतदेह मिळाल्याची माहिती दिली होती मात्र नंतर स्वतः मुख्मंत्र्यांनीच एकहा मृतदेह किंवा गाडी अद्याप मिळाली नसल्याचे स्पष्ट केले होते.पाण्याचा जोराचा प्रवाह आणि पाऊस कोसळत असल्याने बचाव पथकाला वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.तटरक्षक दल,एनडीआरएफ,आणि नाविक दलाचे शेकडो जवान या शोध मोहिमेत सहभागी झाले आहेत.काळ सायंकाळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी घटनास्थळास भेट देऊन शोध मोहिमेची माहिती घेतली.त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सक्षम अधिकार्‍यांची सक्षम अधिकार्‍याकडून चौकशी कऱण्यात येईल अशी घोषणा केली.तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वच ब्रिटिश कालिन पुलांचे सेफ्टी ऑडिट करण्यात येईल असेही त्यानी स्पष्ट केले.महाड दुर्घटनेचा विषय काल विधानसभा तसेच लोकसभेतही उपस्थित झाला होता..-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here