महसूल वसुलीत रायगड कोकणात नंबर वन

0
791

रायगड जिल्हयाने आपला वसुली इष्टांक पार करून 217 कोटी 50 लाख 12 हजार रूपयांचा एकूण महसूल संकलित केला आहे.वसुलीमध्ये तब्बल 102.25 टक्के यश साध्य करून महसुल वसुलीत कोकणात प्रथम स्थान प्राप्त केले आहे.

जमीन महसूल,गौण खनिज,करमणूक कर,आणि शासकीय कर्ज वसुली यांचा शासनाने जिल्हयासाठी 212 कोटी 72 लाख 47 हजार रूपयांचा इष्टांक दिला होता.त्यापेक्षा जवळपास 5 कोटींची अतिरिक्त महसूल जमा झाला आहे.जिल्हयात रेती उत्खननाचे लिलाव वर्षात झाले नसल्याने त्याचा कोटयवधींचा महसूल मात्र बुडाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here