मराठी पत्रकार परिषदेच्या निवडणुका बिनविरोध

    0
    781

    मराठी पत्रकार परिषदेच्या व्दैवार्षिक निवडणुकीत अकोल्याचे सिध्दार्थ शर्मा यांची कार्याध्यक्षपदी तर नाशिकचे यशवंत पवार यांची सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली आहे.सलग दुसर्‍यांदा संस्थेची बिनविरोध निवड झाली आहे ही फार महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे.कारण परिषदेची निवडणूक हे एक मोठं दीव्य असंत.महाराष्ट्रातील 36 जिल्हे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र हा मत दार संघ असतो .राज्यातील परिषदेशी जोडले गेलेले आठ हजार पत्रकार हे मतदार असतात.या मतदारांपर्यत पोहोचणं तर शक्य नसतंच,पण त्यांना पत्र पाठविणंही मोठं खर्चीक असतं.मतदारांना मतपत्रिका पोस्टानं पाठविल्या जातात आणि त्यवार मतदान करून त्या परत मुंबईतील परिषदेच्या कार्यालयात मागविल्या जातात.या सार्‍या प्रक्रियेसाठी दीड महिना लागतो.परिषदेलाही तीन लाखांच्या जवळपास खर्च येतो.अशा स्थितीत एकमतानं निवडणुका होणं हे सार्‍यांसाठीच हिताचं असतं.सुदावानं गेल्या वर्षी प्रमाणंच यंदाही निवडणुका बिनविरोध पार पडलेल्या आहेत.सरचिटणीस आणि कार्याध्यक्ष अशा दोन पदांसाठी निवडणुका जाहीर झाल्यानंतर सरचिटणीसपदासाठी नाशिकचे यशवंत पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोधच निवडून आले होते.कार्याध्यक्षपदासाठी मात्र पाच उमेदवार मैदानात होते.कार्यकारिच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निवडणुका बिनविरोध करण्याचं आवाहन बहुतेक सदस्यांनी केलं होतं.त्यानुसार आज निवडणुका बिनविरोध पार पडल्या.त्याबद्दल पाचही उमेदवारांना मी धन्यवाद देईल.निवडणुका बिनविरोध करताना सर्वच उमेदवारांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल आणि त्यांनी परिषदेची अडचण ओळखून मनाचा मोठेपणा दाखविल्याबद्दलही त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत.त्याच प्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी नागेश कुलकर्णी,आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी शरद काटकर यांनी निवडणूक प्रर्कयि अत्यंत कौशल्यानं पार पाडली त्याबद्दल तेही अभिनंदनास परिषदेच्या .विजयी उमेदवारांचे परत एकदा अभिनंदन.
    पात्र आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here