आमच्या गावची तहान भागणार
मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्याचा छोटासा प्रयत्न

बीड जिल्ह्यातील देवडी हे आमचं गाव. थोडं आडवळणावर असलेलं. . दोन नद्यांच्या मुखावर वसलेल्या या गावात कधी काळी पाण्याची सुबत्ता होती. दोन्ही नद्या बारमाही वहात असत.. गावातील बारव, आड भरलेले असत.. आज स्थिती बदललीय. गावात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य आहे. त्याची अनेक कारणं आहेत. त्या खोलात आज जाण्याचं कारण नाही..पण या पाणी टंचाईवर मात कशी करायची हा कळीचा मुद्दा होता. गावाच्या उत्तरेला दोन नद्यांचा संगम जेथे होतो त्या भागाला आडी म्हणून संबोधले जाते.. या आडीवर जर बंधारा झाला तर गावची पाणी टंचाई कायमची दूर होईल असं आमचे वडिल माणिकराव देशमुख आम्हाला वारंवार सांगत होते.तयासाठी प्रयत्न करा असं त्याचं मला आणि आमचे बंधू दिलीप देशमुख यांना सांगणं असायचं.. ते खरंही होतं. .त्यादृष्टीने आमचे प्रयत्न देखील सुरू होते. .सुनील तटकरे जलसंधारण मंत्री असताना त्यांना आमच्या गावी येण्याची विनंती केली.ते आले देखील.. त्यांना साईटही दाखविली. त्यांनी लगेच दोन्ही नद्यांच्या संगमावर केटी पद्धतीच्या बंधारयस मंजुरी दिली .खरं तर त्याच वेळेस हा बंधारा पूर्ण झाला असता तर आज गाव सुजलाम सुफलाम झाले असते.. मात्र काही गैरसमजातून या बंधारयास तेव्हा विरोध झाला त्यामुळे शासकीय मंजुरी मिळाल्यानंतरही हा प्रकल्प होऊ शकला नाही.. त्यानंतरही आमच्या परिवाराचा या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरूच राहिला. ग्रामस्थांशी पुन्हा चर्चा केली.. त्यांचे मन वळविण्यात आम्ही यशस्वी झालो. पुन्हा एकदा सरकार दरबारी माझा पाठपुरावा सुरू झाला पण यश येत नव्हते.. शासकीय योजनांमधून हे काम होणार नसेल तर एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हे काम करता येईल काय? या दृष्टीनं मी आणि माझे बंधू दिलीप देशमुख यांचा प्रयत्न सुरू झाला. ..विविध संस्थांशी बोलणी केली. अखेर या प्रयत्नास यश मिळाले . पुणे विभागीय सह धमॅदाय आयुक्त असलेल्या दिलीप देशमुख यांनी मा. प्रताप पवार यांच्याकडे या बंधारया संदर्भात शब्द टाकला आणि त्यांनी सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून बंधारा बांधण्याची तयारी दशॅविली . त्यानंतर सकाळची यंत्रणा कामाला लागली. ६१ लाख रूपयांचे इस्टीमेट तयार केले गेले. जवळपास 70 मिटर रूंदीचया बंधाऱ्याच्या पहिल्या टप्प्याच्या म्हणजे नदीच्या खोलीकरण आणि रूंदीकरणाचया कामाचा शुभारंभ आज दिनांक 26 मार्च २०१९ रोजी सकाळी करण्यात आला .. गावचे दोन वेळा सरपंचपद भूषविलेले आमचे वडील माणिकराव देशमुख यांच्या हस्ते नारळ वाढवून बंधाऱ्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला.यावेळी सकाळचे बीड जिल्हा प़तिनिधी दत्ता देशमुख, गुततेदार राजेंद्र बोबडे, पत्रकार अनिल वाघमारे तसेच गावचे सरपंच जालिंदर झाटे, भाजपचे मच्छिंद्र झाटे, राष्ट्रवादी युवा कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष विश्वास आगे, बाबासाहेब झाटे, तुळशीराम राऊत, आसाराम झाटे, उपसरपंच गवरचंद आगे तसेच गावातील अन्य प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती..
गावच्या कल्याणासाठीचे आम्ही पाहिलेले एक स्वप्न सकाळ रिलिफ फंडाच्या माध्यामातून पूर्णत्वास जात आहे तयामुळे आम्ही सारे देशमुख कुटुंबिय आज स्वप्नपूर्तीचा आनंद उपभोगत आहोत.. आम्हाला विश्वास आहे की हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास या वर्षीपासूनच बंधारयात मोठा जलसाठा तयार होईल त्यामुळे पाणी पातळीत वाढ होईल आणि त्याचा फायदा गावकरयांना होईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर कायमस्वरूपी सुटेलच त्याच बरोबर शेतीला देखील त्याचा लाभ होईल.. बंधारा पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल करण्यासाठी आणि या बंधारयातील पाण्याचा दुरूपयोग होऊ नये यासाठी गावकरयांची एक कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. ती समिती बंधारयाची “काळजी” घेईल
गावच्या हिताचं मोठं काम आमच्या हातून घडतंय ही आमची ग्राम देवता राणूबाईची कृपा आणि आमच्या आई वडिलांची पुण्याई आहे असे आम्ही समजतो.
गावकरयांनाही या निमित्तानं धन्यवाद द्यावे लागतील..त्यांचं सहकार्य, पाठपुरावा, यामुळेच हे काम मार्गी लागू शकले आहे..सकाळ रिलीफ फंडाचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत..मराठवाडयातील दुष्काळावर मात करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.. त्यात आम्हाला यश मिळावे यासाठी आपल्या शुभेच्छांची आम्हाला गरज आहे..
एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here