मंगळवारी बेळगावात..

मराठी पत्रकार परिषदेला येत्या 3 डिसेंबर रोजी 80 वर्षे पूर्ण होतील.मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न अनेक जिल्हा संघांनी सुवर्ण महोत्सव साजरा केलेला आहे.परिषदेशी राज्यातील सर्वच जिल्हे संलग्न आहेतच शिवाय अन्य राज्यातही परिषदेच्या शाखा आहेत.बेळगावमध्येही परिषद कार्यरत आहे.बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघ हा परिषदेशी संलग्न आहे.बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नोंदणीला चार दशके झाली असली तरी हा सघ त्यापूर्वीही कार्यरत होता.आचार्य प्र.के.अत्रे परिषदेचे अध्यक्ष असताना 11 फेब्रुवारी 1950 रोजी आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे परिषदेचे दहावे अधिवेेशन झाले होते.अध्यक्षपदावरून अत्रे यांनी केलेले भाषण तेव्हा बरेच गाजले होते.आचार्य अत्रे यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नांचा धांडोळा तर घेतला होताच त्याचबरोबर वृत्रपत्रसृष्टीत शिरणार्‍या भांडवलदारांचाही खास अत्रे शैलीत समाचार घेतला होता.आचार्य म्हणाले होते,’पत्रव्यवसाय हा जरी धंदा असला तरी पत्रकाराची वृत्ती हा मात्र एक महान धर्म आहे.धंद्याला धर्माचे स्वरूप द्यावे पण धर्माचा मात्र धंदा करू नये’.मंगळवारी एका कार्यक्रमासाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निमंत्रणावरून बेळगावला जात आहे.त्यानिमित्तानं या सर्व आठवणी जाग्या झाल्या.

बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या काही मागण्या आहेत..तेथील मराठी भाषक पत्रकारांना अधिस्वीकृती हवी आहे.ती मिळावी यासाठी ही सारी मंडळी कोल्हापुरच्या बैठकीच्या वेळेस आली होती.बेळगावकर मराठी पत्रकारांना अधिस्वीकृती द्यावी अशी मागणी समितीतील बहुतेक सदस्यांनी केली होती.त्यानंतर अशी पत्रिका अन्य राज्यातील पत्रकारांना देता येईल की नाही यावर मंथन झाले.मग एक सदस्य समिती नेमण्याचा फार्स झाला.त्या समितीनं आपला अहवाल देताना अधिस्वीकृती द्यायला हरकत नाही असं मत व्यक्त केलं.त्या गोष्टीलाही आता दीड वर्षे होऊन गेलं.मात्र बेळगाव सीमा भागातील मराठी बांधव पत्रकारांना आम्ही अधिस्वीकृतीही देऊ शकलेलो नाहीत.नुसतीच जुमलेबाजी  .सीमा भागातील मराठी वृत्तपत्रांना महाराष्ट्र सरकार जाहिराती देते पण अधिस्वीकृती मात्र देत नसेल तर सीमा भागाबद्दल सरकारच्या मनात आणि धोरणात किती संभ्रम आहे याचा अंदाज आपण करू शकतो.मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे की,सीमा भागातील मराठी भाषक पत्रकारांना पेन्शन देखील मिळाले पाहिजे.कारण बहुतेक मराठी भाषक पत्रकारांना कर्नाटक सरकार पेन्शन देत नाही.आम्ही नक्कीच यासाठी सरकारकडं पाठपुरावा करू..कारण सीमा प्रश्‍न जिवंत ठेवण्याचे काम सीमा भागातील मराठी पत्रकारांनी नक्कीच केले आहे.या चळवळीत मराठी पत्रकारांची भूमिका देखील महत्वाची होती..त्यांनाच आपण विसरणार असू तर आपल्यासारखे कृतघ्न दुसरे कोणी नाही असे म्हणावे लागेल.या सर्व गोष्टींची आणि सीमा भागातील मराठी पत्रकारांना भेडसावणार्‍या प्रश्‍नांची सखोल चर्चा आम्ही मंगळवारी बेळगावमध्ये करणार आहोत.माझे सहकारी किरण नाईक,गजानन नाईक,अनिल महाजन,शरद पाबळे माझ्याबरोबर असणार आहेत.(SM )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here