देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेले रायगड जिल्हयाच्या माणगाव तालुक्यीतील भिरा आणखी किमान तीन दिवस उष्ण राहणार असून त्यानंतर तापमानात क्रमशः घट होत जाईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.मंगळवारी भिराचे तापमान 46.6 अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले.कालही त्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही.मात्र आजपासून तापमानात किंचिंत घट होऊन ते 46 अंश सेल्सियस पर्यत असेल तर 2 एप्रिल रोजी 45,3 एप्रिल रोजी 44,4 एप्रिल रोजी 43 अंश सेल्सियस एवढे असेल असे हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.रायगड जिल्हयात अन्यत्र तापमान 30 अंश सेल्सियश ते 36 अंश सेल्सियस असताना भिरा येथे एवढे उचांकी तापमान का झाले याचा उलगडा अजूनही झालेला नाही.माणगाव तालुक्यातील भिरा येथे जल विद्युत केंद्र आहे.पुढील दोन दिवस उष्ण लहरी वार्याचे संकट कोकणात असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.काल बुधवारी थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये 28 अंश सेल्सियस एवढे तापमान होते.तर पेण,कर्जत,खालापूर येथे 32,पनवेल येथे 31,अलिबाग,उरण,मुरूड,म्हसळा,रोहा येथे 30,पाली-सुधागड श्रीवर्धन येथे 29 अंश सेल्सियश तापमानाची नोंद झालेली आहे.कोकणात एवडया मोठ्या प्रमाणात प्रथमच उष्णता असल्याने कोकणी जनता हैराण झाली आहे.ः