मनिलाः भारतीय माध्यमं संकटात असून हे अपघातानं घडलेलं नाही,तर ़ठरवून केलेलं षड्यंत्र असल्याचं मत प्रख्यात पत्रकार रविशकुमार यांनी व्यक्त केलं. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनेचे वरिष्ठ कार्यकारी संपादक असलेल्या रविशकुमार यांना काल मॅगेसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.रविशकुमार म्हणाले भारतीय माध्यमं संकटात का आहेत याचं मूल्यमापन करणं आवश्यक आहे.सर्वच लढाया जिंकण्यासाठी केल्या जातात असं नाही अनेकदा मनात नसतानाही लढा पुकारावा लागतो.युध्दभूमीवर कुणीतरी लढते आहे हे इतरांच्या ध्यानी आणून देण्यासाठी मैदानात उतरावे लागते असंही ते म्हणाले.ते म्हणाले 370 कलम रद्द् केल्यानंतर काश्मीर अनेक निर्बंध लागू करण्यात आले.तिथे इंटरनेट सेवा अद्यापही खंडित आहे अशा वातावरणात काही प्रमुख वाहिन्या फक्त सरकारची बाजू दाखविण्यात समाधान मानताना दिसत आहेत.

 मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाल्यापासून माझं जग बदललं आहे. या देशाने दिलेला सन्मान आणि येथील पाहुणचार बघून मी भारावून गेलो आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मी अजून जबाबदार झालो असल्याचेही ते म्हणाले. 

LEAVE A REPLY