बोरघाटात भीषण अपघात 5 ठार

0
195

अलिबागः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली.पुण्याहून मुंबईच्या दिशेने सिमेंट बॅगा घेऊन जाणा़र्‍या  ट्रक चालकाचे े बोगदा ओलांडताच वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक मुंबईलेनवरून पुणे लेनवर पलटी झाला त्याच वेळी पुण्याच्या दिशेनं जाणार्‍या तीन कार या ट्रक खाली चिरडल्या गेल्या त्यात चार जणांचा जागीच तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे.अपघातानंतर ट्रकमधील सिमेंटची पोती रस्तयावर इतस्ततः विखूरली गेली.त्यामुळं काही काळ पुण्याकडं येणारी वाहतूक ठप्प झाली होती.अपघाताची माहिती कळताच खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे.

LEAVE A REPLY