अध्यक्षपदी सुधीर चेके

0
1173

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आज सुधीर चेके पाटील यांची निवड झाली आहे.मावळत्या कार्यकारिणीत चेके पाटील हे कार्याध्यक्ष होते.परिषदेच्या घटनेनुसार कार्याध्यक्ष हा अध्यक्ष होतो.त्यानुसार चेके पाटील यांनी आज राजेंद्र काळे यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.चेके पाटील यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा दोन वर्षांचा असेल.कार्यकारिणीतील अन्य पदे लवकरच निवडले जातील असे चेके पाटील यांनी सांगितले.राजेंद्र काळे यांची परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून यापुर्वीच निवड झाली आहे.बुलढाण्याला हा बहुमान प्रथमच मिळाला आहे.
पुणे जिल्हयातील चार-पाच तालुका संघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत.ज्या जिल्हा किंवा तालुका संघांनी आपली मुदत संपूनही अद्याप निवडणुका घेतलेल्या नाहीत त्यानी तातडीने निवडणुका घ्याव्यात असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here