जिल्ह्यातील पत्रकारांना 4 कोटी 50 लाखाची विमा कवच-सुभाष चौरे

लवकरच वितरण कार्यक्रम ; मराठी पत्रकार परिषदेचे स्तुत्य उपक्रम

बीड : बीड जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध समस्या अडीअडचणी पाहता पत्रकारांच्या हितासाठी झगडणार्‍या मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन बीड जिल्ह्यातील परिषदेेशी संलग्‍न असलेल्या सभासदांसाठी जवळपास 4 कोटी 50 लाख रुपयाचा विमा काढला असुन या पत्रकारांना हे एक प्रकारे कवच असुन लवकरच एका विशेष कार्यक्रमामध्ये पत्रकारांना विमा पॉलिसीचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे यांनी दिली आहे. पत्रकारांसाठी मराठी पत्रकार परिषदेने राज्यात पहिलाच चांगला निर्णय घेतल्यामुळे या निर्णयाचे स्वागत होईल.

मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्‍न असलेल्या मराठी पत्रकार परिषद शाखा बीडची पुर्न:बांधणी झाल्यानंतर लोकशाही मार्गाने या परिषदेची निवडणुक घेवुन अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या माध्यमातुन पत्रकारांच्या हिताचे निर्णय घेतले जावे हीच भुमिका परिषदेचे राज्यअध्यक्ष एस.एस.देशमुख, विभागीय सचिव अनिल महाजन यासह वरीष्ठ मार्गदर्शक संपादकांनी व्यक्‍त केली होती. त्यानुसार दोन दिवसा पुर्वीच विभागीय सचिव अनिल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैंठक झाली या बैठकीला जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, सरचिटणीस भास्कर चोपडे, कार्याध्यक्ष दत्ता अंबेकर, कोषाध्यक्ष संदीप लवांडे, अनिल वाघमारे, सुनिल क्षीरसागर, सुधाकर सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. याच बैठकीमध्ये सभासद असलेल्या सर्व पत्रकारांंचा विमा काढण्याचे ठरले. त्यानुसार या विमा कवच पॉलिसीची संपुर्ण जवाबदारी विभागीय सचिव अनिल महाजन व अनिल वाघमारे यांच्याकडे देण्यात आली त्यानुसार त्यांनी बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या जवळपास 450 सदस्यांच्या विमा पॉलीसीचा धनादेश संबंधीतांना देवुन जवळपास 4 कोटी 50 लाख रुपयाचे विमा कवच जिल्ह्यातील पत्रकारांसाठी देण्याचा धाडसी आणि महत्वपुर्ण निर्णय मराठी पत्रकार परिषदेने घेतला आहे.जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये मराठी पत्रकार परिषद शाखा बीड हीच एकमेव संघटना पत्रकारांसाठी विमा पॉलिसी काढणारी ठरली आहे. या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. लवकरच एका कार्यक्रमामध्ये विमा पॉलिसीचे वितरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here