बिबट्‌याची शिकार ?

0
684

मुरूड तालुक्यातील वावेगावातील हनुमान डुंगी परिसरात एक बिबट्या आज सकाळी मृतावस्थेत आढळून आला.बिबट्याच्या चारही पायाचे पंजे गायब असल्याचे दिसून आले आहे.बिबट्याचं धडही जमिनीत पुरल्याचं दिसून आलं आहे.हा शिकारीचा प्रकार आहे काय याची वन खाते चौकशी करीत आहे.
मुरूड तालुक्यात 58 चौरस किलो मीटरच्या परिक्षेत्रात अभयारण्य असून तेथे बिबट्यासह अनेक वन्य प्राणी आढळतात.
बिबट्या जमिनीत पुरल्याची माहिती मिळाल्यानंतर फणसाड अभयारण्याच्या सहाय्यक वन संरक्षख सरोज गवस यांनी परिसर पिंजुन काढला आणि जमिनीत पुरलेला बिबट्याचे अवशष शोधून काढले.मृत बिबट्याचं शवविच्छेदन कऱण्यात आलं आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here