*बाळशास्त्री जांभेकर यांच्या

स्मारकाच्या बांधकामास गती*.

पत्रकारांसाठी आनंदाची बातमी आहे.. सिंधुदुर्गमधील ओरोसमध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर याचं स्मारक होत आहे.. सरकारनं त्यासाठी निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे.. मात्र काही कारणांनी हे काम रेंगाळले होते.. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेचे काया॓धयक्ष गजानन नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेऊन स्मारकाचे काम निर्धारित वेळेत आणि गतीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली होती.. पांढरपट्टे यांनी या विषयात लक्ष घालून ठेकेदाराला काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता काम पुन्हा सुरू झाले असून पहिला स्लॅब टाकला जात आहे.. परिषद आणि जिल्हा पत्रकार संघाच्या सवॅ पदाधिकारयांचे अभिनंदन.. त्यांच्या पाठपुराव्यामुळं स्मारकाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होण्याचा प़क़िया सुरू झाली आहे.. हे स्मारक व्हावं यासाठी महाराष्ट्रातील पत्रकार कित्येक वर्षे प़यतन करीत होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here